राफेल फायटर जेट्सचा अरबी समुद्राच्या हद्दीमध्ये प्रवेश होताच   INS Kolkata सोबत संपर्क;  ऐका हा खास Audio
Rafale Fighter Jets Establish Contact With Indian Navy Warship INS Kolkata (Photo Credits: ANI)

फ्रान्स मधून भारताच्या दिशेने झेपावलेली राफेल विमानं आता अवघ्या काही वेळात भारतामध्ये दाखल होतील. दरम्यान देशात हद्दीत आल्यानंतर आता राफेल विमानांचा पश्चिम अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौसेनेच्या INS कोलकाता सोबत संपर्क झाला आहे. काही वेळापूर्वीच ANI या वृत्तसंस्थेकडून त्याचा एक खास ऑडिओ रिलिज करण्यात आला आहे. दुपारी 2 च्या सुमारास राफेल विमानं हरियाणा येथील अंबाला बेसकॅम्पवर लॅन्डिंग करणार आहेत.

अंबाला मध्ये दाखल झाल्यानंतर या राफेल विमानांना वॉटर सेल्युट दिले जाणार आहे. दरम्यान अंबालामध्ये IAF chief Air Chief Marshal RKS Bhadauria राफेलचं स्वागत करणार आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज अंबालामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून पावसाची शक्यता आहे.

राफेल विमानांच्या अंबालामध्ये होणार्‍या लॅन्डिंगच्या पार्श्वभूमीवर आता आजुबाजूच्या 4 गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान घरांच्या छतांवर उभं राहणं, लॅन्डिंग़चे फोटो, व्हिडिओ शूट करणं यावर बंदी आहे. (हेही वाचा, Rafale Aircraft: राफेल ची पहिली पाच लढाऊ विमाने आज भारतात येणार, अमूल ने डूडल च्या माध्यमातून केलं खास स्वागत).

ANI Tweet

अमूल ने देखील या पार्श्वभूमीवर आपले डूडल ट्विट केले आहे. या डूडल मध्ये 'जब वी जेट' या Pun सह राफेलचं चित्र आहे. अमूल डूडल मॅस्कॉट मुलगी यामध्ये पायलटच्या गणवेशात आहे. दरम्यान 7 हजार किमीचा प्रवास करून ही विमान भारतामध्ये दाखल झाली आहे.