Rafale Aircraft: राफेल ची पहिली पाच लढाऊ विमाने आज भारतात येणार, अमूल ने डूडल च्या माध्यमातून केलं खास स्वागत
Rafale Aircraft Delivery Amul Doodle (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमानाची (Rafale Aircrafts) पहिली तुकडी आज भारतात लँडिंग करणार आहे. भारतीय हवाईदलाची (Indian Airforce) ताकद वाढवणाऱ्या या विमानांवरून भूतकाळात केंद्र सरकार व विरोधी पक्ष काँग्रेस मध्ये बरेच वाद, आरोप प्रत्यारोप झाले आहेत, मात्र आता अखेरीस पहिल्या पाच विमानांची डिलिव्हरी भारतात पोहचणार आहे. अंबाला (Ambala) येथे दुपारी 2 वाजता विमानांचे लँडिंग होणार असून यासाठी आजूबाजूच्या भागात कलम 144 अंतर्गत संचार व फोटोग्राफी ला बंदी घातली आहे. यावेळी हवाईदलाचे एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया (Chief of Air Staff RKS Bhadauria) सुद्धा उपस्थित असणार आहेत. या महत्वाच्या क्षणी अमूल इंडिया (Amul India) तर्फे सुद्धा एका खास डूडल च्या माध्यमातून या राफेल विमानांचे स्वागत केले गेलेय.

अमूल ने आपले डूडल शेअर करताना ट्विट करत आज राफेलची पहिली तुकडी भारतात येणार असल्याचा उत्साह व्यक्त केला आहे. या डूडल मध्ये 'जब वी जेट' या Pun सह राफेलचं चित्र आहे. अमूल डूडल मॅस्कॉट मुलगी यामध्ये पायलटच्या गणवेशात दिसून येतेय.

AMUL ट्विट

राफेल विमाने, ट्विट

दरम्यान , राफेल लढाऊ विमाने आज भारतात येणार या मुद्द्यावरून सुद्धा पुन्हा काँग्रेस आणि केंद्र सरकार मध्ये वादावादी सुरु झाली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी "चौकीदार जी, अब तो किंमत बता दिजिये" अशा शब्दात ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा केले होते.