Representational Image | (Photo Credits: ANI)

16 एप्रिल दिवशी मुंबईतील कांदिवली मधून गुजरातच्या दिशेने जाणार्‍या 3 जणांची पालघर नजीक गावामध्ये निर्घुण हत्या झाली. या हत्याकांडाने भारत देश हादरला. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत 110 आरोपींना अटक केल्याची यादी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र आज यामध्ये 5 अजून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. काही वेळापूर्वी या पाचही आरोपींचा ताबा सीआयडीकडे देण्यात आला आहे. दरम्यान त्यांना 13 मे पर्यंत सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. Palghar Mob Lynching प्रकरणी 8 तासांत 101 जण ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केली आरोपींची यादी.

पालघर हत्याकांडामध्ये 115 जण अटकेत असून त्यामध्ये 9 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 24 मार्चपासून सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये गडचिंचले मध्ये गावात लहान मुलांचं अपहरण करण्यासाठी काही टोळ्या फिरत असल्याच्या अफवा होत्या. यामधूनचा ही हत्या झाल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांवरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार काहींच्या बदल्या तर काही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील 2 पुजा-यांच्या हत्येचे पालघर प्रमाणे राजकारण करु नका- संजय राऊत.

ANI Tweet

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयामध्येही पालघर हत्याकांड बद्दल सुनावणी झाली. यामध्ये पोलिसांना चार आठवड्याच्या आतमध्ये एक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये त्यांना पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये इतक्या लोकांना एकत्र जमण्याची परवानगी कशी दिली? याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. दरम्यान हत्या झालेल्यांमध्ये 2 साधू आणि ड्रायव्हरचा समावेश होता.