Palghar Mob Lynching प्रकरणी 8 तासांत 101 जण ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केली आरोपींची यादी
Anil Deshmukh | | (Photo credit: Facebook)

आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून जनतेला संबोधित केलं आहे. दरम्यान पालघर लिचिंग प्रकरण आणि वाधवान कुटुंब याबद्दल त्यांनी माहिती आहे. दरम्यान  पालघर लिंचिंग प्रकरणामध्ये 8 तसांत 101 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांची संपूर्ण यादी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच या घटनेला धर्माच्या राजकारणाचे रंग देणार्‍यांनाही ही राजकारण करण्याची वेळ नाही. या आरोपींच्या यादीमध्ये एकही मुस्लिम व्यक्ती नसल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. सोबतच या घटनेचा पुढील तपास सीआयडीच्या एका विशेष आय जी स्तरावरील अधिकार्‍यांच्या माध्यमातून केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. Coronavirus: क्वारंटाईन कालावधी संपताच वाधवान कुटुंबीयांचा ताबा ED कडे - गृहमंत्री अनिल देशमुख.  

दरम्यान काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यानजिक 3 जणांची रात्री चोर असल्याच्या संशयावर निर्घुणपणे हत्या करण्यात आली. ही मंडळी साधू असल्याने देशभरात या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘ओये बस’च्या ऐवजी 'शोएब' असा विपर्यास झाला आणि  या घटनेला जातीय रंग चढला. मात्र सध्या राज्य कोरोनाविरूद्ध लढाई लढत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं  आहे.  पोलिस घटनास्थळी असूनदेखील ही हत्या कशी झाली? यावरून पोलिस खात्याच्या निष्क्रियतेवर प्रश्न उठवण्यात आले आहेत. मात्र आता त्यावर पोलिस खात्याकडून पुढील तपासणी केली जाणार आहे.

ANI Tweet

दरम्यान पालघरमधील घटना ही सोशल मीडियावरील  अफवांमुळे झाली आहे. यामध्ये काहींनी लहान मुलांचं किडनॅपिंग होत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तुमच्याकडे येणार्‍या माहितीची शहानिशा करण्याचं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.

आरोपींच्या नावाची यादी  

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही 'पालघर घटनेची निंदा केली आहे. या घटनेवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल'', असे अश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.