Coronavirus: क्वारंटाईन कालावधी संपताच वाधवान कुटुंबीयांचा ताबा ED कडे - गृहमंत्री अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

लॉकडाऊन (Lockdown) काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांचा क्वारंटाईन (Quarantine कालावधी समाप्त होत आहे. तत्पूर्वीच आम्ही अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयाला कळवले आहे. त्यामुळे हा कालावधी संपताच वाधवान कुटुंबीय हे अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कायदा मोडणारी कोणतीही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. तसेच, या आधी जसे काही लोक लंडनला पळून गेले तसे पळून जाणार नाहीत याची महाराष्ट्र सरकार पुरेपूर काळजी घेईन, असेही अनिल देशमुख (Anil Deshmukh) या वेळी म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाध साधला. या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात अनेक घडामोडी घडल्या. ज्यातील काहींचा चुकीचा अर्थ लाऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. पालघर प्रकरण यापैकीच एक. पालघर प्रकरणामागे कोणतेही धार्मिक कारण नव्हते. तरीही त्याला काही लोकांकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असेही देशमुख यांनी म्हटले. (हेही वाचा, पालघर येथील घटनेचं राजकारण करू नका- शरद पवार)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

अनिल देशमुख फेसबुक लाईव्ह व्हिडिओ

पुढे बलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, CID च्या एका विशेष IG स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत पालघर प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत 8 तासांच्या आत सुमारे 101 जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींची नावे आम्ही व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमातून जाहीर करत आहोत. या यादीत कोणत्याही मुस्लिम बांधवाचे नाव नाही, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वेळी म्हटले.