UP And Sanjay Raut (Photo Credits: ANI/

एकीकडे कोरोना व्हायरस महाभयाण संकट देशवासियांच्या मानगुटीवर बसलेले असताना दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनांनी देखील देशाला हादरवून सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पालघर मध्ये चोर समजून 2 साधू आणि 1 ड्रायव्हर यांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात आणखी एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील (UP) बुलंदशहर (Bulandshahar) येथील एका मंदिरातील दोन पुजाऱ्यांची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेचे पालघर प्रमाणे राजकारण न करता शांतता राखा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला आहे.

पागोना गावातील शिव मंदिर परिसरात ही घटना घडली असून मंदिराच्या कंपाउंड मध्ये या पुजार्‍यांचे मृतदेह आढळून आले होते. "या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील" अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

हेदेखील वाचा- उत्तर प्रदेश: बुलंदशहर येथील मंदिरातील पुजाऱ्यांची गळा दाबुन हत्या; आरोपींंना अटक

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर यांसंबंधी बोलणे झाले आहे. अशा अमानुष घटना घडतात तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करून गुन्हेगाराना शासन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून याबाबतची माहिती घेतली होती.