ठाणे: Yes Bank चा ग्राहक नसूनही  व्यावसायिकाला कोट्यावधीची नोटीस जारी
Yes Bank (Photo Credits: File Photo)

पॉवर सप्लाय आणि बॅकअप इव्किंप्मेंट यांचा डिलर असलेल्या एका व्यावसायिकाला येस बॅंकेकडून सप्टेंबर 2019 ला कोट्यावधी रूपयांची थकबाकी असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाणे स्थित या व्यावसायिकाचं येस बॅंकेमध्ये खातं नाही, पूर्वी बॅंकेसोबत व्यवहार केलेला नाही तरीआलेया या नोटीशीमुळे तो हैराण झाला आहे. मागील वर्षभरापासून हा व्यावसायिक नोटिस मागे घेण्यासाठी हेलपाटा मारत आहे. दरम्यान या व्यावसायिकाचा वर्षाचा टर्नओव्हर 25 लाखाचा आहे. अद्याप त्यांना बॅंकेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान ठाणे स्थित सचिन तळावडेकर या व्यावसायिकाने संबंधित प्रकरणाबद्दल पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली असून त्याबाबत तपास सुरू आहे. सचिन याची Global Techno India कंपनी असून पॉवर बॅक अप सोल्युशन, यूपीएस, बॅटरी, जनरेटर, इन्वरटर याचा व्यवसाय आहे. दरम्यान मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना one Dion Global Solutions Limited या कंपनीसाठी येस बॅंकेत थेट थकबाकी भरावी अशाप्रकारची नोटीस आली होती. दरम्यान मुंबई मिररला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी one Dion Global Solutions Limited शी आपला यापूर्वी कोणताच व्यवहार झालेला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सुमारे 152 कोटी रूपयांचे देणं बाकी आहे.

नोटिस मिळाल्यानंतर त्यांनी तलावपाळीजवळ असलेल्या येस बॅंकेच्या शाखेकडे तक्रार केली पुढे पोलिस तक्रार केली. त्यावेळेस दिल्लीहून ज्यांनी नोटीस पाठवली त्यांना याबाबत विचारणा करत असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर कुठलाच पाठपुरवठा केलेला नाही.