Accident | Representational Image (Photo Credits: Pixabay)

लग्नामध्ये हुंड्याची (Dowry) भेट म्हणून मिळालेली कार निष्काळजीपणे चालवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. हुंड्यात मिळालेली कार चालवण्याचा मोह नवऱ्या मुलाला झाला. ही कार चालवताना अपघात (Accident During Test Drive Car) घडला. या अपघातात एक महिला ठारत तर लहना मुलासह इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सरला देवी (वय 35) असे पीडित महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये एका १० वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. सदर घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील इटावा येथील अकबरपूर गावात घडली.

अरुण कुमार हा 24 वर्षीय तरुण पेशाने पीएसी जवान आहे. त्याचा विवाह ठरल्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता. दरम्यान, अरुण कुमार याच्या कुटुंबाला वधुच्या म्हणजेच होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाकडून हुंडा म्हणून कार भेट देण्यात आली. अरुण कुमार याला नवी कोरी कार तर मिळाली. पण त्याला ती चालवता येत नव्हती. वाहन चालवण्याचे त्याने योग्य प्रशिक्षण घेतले नव्हते. (हेही वाचा, Muslim Personal Law Board: हुंडा घ्याल तर लग्न नाही लावणार,मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय)

वाहन चालविण्याचे योग्य प्रशिक्षण घेतलेले नसताना आणि वाहन निट चालवता येत नसतानाही अरुण कुमार याने कार चालविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयच धोकादायक ठरला. अरुण कुमार याने कार सुरु तर केली. परंतू, गाडी सुरु केल्यावर त्याने ब्रेक दाबण्याऐवजी तिने एक्सलेटर दाबला आणि गाडी वेगात पुढे गेली. गाडीने क्षणात वेग धारण केला आणि ती काही अंतरावर उभ्या असलेल्या नातेवाईकांच्या समूहावर आदळली. या घटनेत त्याची मावशी जागीच ठार झाली. तर, इतर चार नातेवाईक गंभीर जखमी झाले. ज्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.