तेलंगणा मधील वारंगल जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या आजोबांचा मृतदेह मृत्यूनंतर फ्रिजमध्ये ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ऐवढेच नव्हे तर हे कृत्य केल्यानंतर तो घरात आरामात राहत होता. शेजारच्यांना जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली असता त्याबद्दल पोलिसांना त्यांनी कळवले. पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्यांना घरातील फ्रिजमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तरुणाला ताब्यात घेतले आहे.(Chennai Sexual Harassment Case: स्वत:च्या आजोबा, मामा, आणि भावाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)
पोलिसांच्या मते वृद्धाचे वय 93 वर्ष होते. तो वृद्ध व्यक्ती आपल्या नातवासोबत वारंगल जिल्ह्यातील परकल येथील एका घरात राहत होता. असे सांगितले जात आहे की, तरुणाच्या घरातून खुप दुर्गंधी येत होती. शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबद्दल सांगितले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसंनी घरात तपास सुरु केला. त्याचवेळी त्यांना फ्रिजमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह हा काही दिवसांपूर्वीचा असल्याचे दुर्गंधी येत होती. पोलिसांनी तातडीने नातू निखिल याला ताब्यात घेतले.(Khajuri Khas Encounter: दिल्ली येथील खजूरी खास येथील पोलीस चकमकीत दोन गुन्हेगार ठार)
निखिल याने पोलिसांना सांगितले की, चार दिवसांपूर्वीच आजोबांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर अंतिम संस्कारासाठी पैसे नसल्याने त्याने त्यांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. मात्र पोलिसांना निखिल याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आहे. असे सांगितले जात आहे की, निखिल याचे आई-वडिल काही वर्षांपूर्वी रस्ते अपघतात मृत पावले होते. त्यामुळे निखिल याला धक्का बसला होता. त्याची मानसिक स्थिती सुद्धा ठिक नव्हती. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. शवविच्छेदनाचे रिपोर्ट्स आल्यानंतर आता पुढील माहिती समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.