Chennai Sexual Harassment Case: स्वत:च्या आजोबा, मामा, आणि भावाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

देशात लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच एक चैन्नईमधील (Chennai) धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेत चेन्नईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आजोबा, मामा आणि भावासह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केले आहेत.  अशा गंभीर गुन्ह्यासाठी या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती  पोलिसांनी (Chennai Police) दिली आहे. तिघांनी सात वर्षांच्या मुलीवर चेन्नईतील माडीपक्कमजवळ (Madipakkam) राहत्या घरी लैंगिक अत्याचार केले. आजोबा आणि मामांना तुरुंगात (jail) पाठवण्यात आले. तर मुलाच्या भावाला सुधारात्मक सुविधेत पाठवण्यात आले आहे.

62 वर्षीय आजोबांनी आपली मुलगी कामात व्यस्त असल्याने आपल्या नातवंडांना घरी आणण्याचा निर्णय घेतला. सर्व नातवंड त्यांच्या घरातून ऑनलाईन वर्ग घेत होते. त्या व्यक्तीचा 42 वर्षांचा मुलगाही त्याच्यासोबत राहत होता. एके दिवशी अल्पवयीन  मुलगी झोपलेली असताना आजोबांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिच्या आजोबांच्या वागण्याने हैराण होऊन ती मदतीसाठी तिच्या मामांकडे धावली. मात्र मामांनीही तिच्याशी गैरवर्तनही केले. त्यानंतर घाबरलेली मूलगी तिच्या 16 वर्षीय भावाकडे गेली. ज्याने तिच्यावर हल्ला केल्याची तक्रार तिने केली आहे.

मुलीची आई तिच्या मुलांना भेटायला आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  चालण्यास असमर्थ असलेल्या तिच्या आजारी मुलीला पाहून तिने मुलीला एका रुग्णालयात नेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. आईने मडीपक्कम महिला पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मुलीला बाल आरोग्य संस्था आणि मुलांच्या रुग्णालयात पाठवले आहे.

देशात बलात्काराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात काही आरोपींना पकडले जाते. तर काही आरोपींना पीडितेने तक्रार न केल्याने अटक केली जात नाही. अशा गुन्ह्यांमध्ये पीडितेला घाबरवले जाते. यामुळे अशा अजुन काही घटना या समोर येत नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट फिरतात. असे गुन्हे कमी होण्यासाठी योग्य ती कठोर अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.