Sai Vardhan (Photo Credits: Twitter)

तेलंगणा (Telangana) मधील मेडक (Medak) जिल्ह्यात बुधवारी (27 मे) बोरवेल (Borewell) मध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी (28 मे) सकाळी बोअरवेल मधून या बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साई वर्धन (Sai Vardhan) असे या मुलाचे नाव असून तो बोरवेलमध्ये 17 फूटापर्यंत खोल गेला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेक्स्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफच्या (NDRF) टीमला पाचारण करण्यात आले.

मेडक जिल्हाधिकारी के. धर्मरेड्डी (K Dharma Reddy) यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल तीन वर्षांचा मुलगा साई वर्धन याचा मृतदेह बोअरवेलमध्ये 17 फूट खोलातून काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. परवानगी शिवाय 3 बोअरवेल खोदण्यात आले होते. त्यामुळे चौकशीनंतर आवश्यक कारवाई करण्यात येईल."

ANI Tweet:

"मुलाला बोअरवेल मधून बाहेर काढण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र तो जिवंत आहे की नाही हे सांगता येणार नाही," अशी माहिती मेडक जिल्ह्याच्या एसपी चंदना दीप्ती Chandana Deepti) यांनी दिली होती. दरम्यान जिल्ह्याचे वरिष्ठ ऑफिसर आणि पोलिस अधिकारी देखील या रेस्क्यू ऑपरेशनची निगराणी करत होते.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मेडक जिल्ह्यातील पापन्नापेट मंडल येथील एका शेतात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. तिथे साई वर्धन वडील आणि आजोबांसह फिरत होता. फिरता फिरता चुकून तो बोअरवेल मध्ये पडला. हा बोअरवेल 120 फूट खोल असून त्यात पाणी लागलेले नसतानाही तो खुला ठेवण्यात आला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.