अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) हे आपल्या मक्कल नीधी मय्यम ( Makkal Needhi Maiam) पक्षाच्या वतीने तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Elections 2021) मध्ये उतरले आहेत. विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी कोयंबटूर (Coimbatore) विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे. कमल हासन यांच्या MNM पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज (शुक्रवार, 12 मार्च) जाहीर केली. या यादीत कमल हासन यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. तामिळनाडूमध्ये या वेळी काँग्रेस आणि एआडएडीएमके तर भाजप डीएमके पक्षासोबत आघाडी करुन लढत आहे. कमल हासन यांचा एमएनएम हा पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात अगदीच नवखा आहे. त्यामुळे या पक्षाला जनता कशी स्वीकारते याबाबत उत्सुकता आहे.
MNM पक्षाच्या दुसऱ्या यादीतील प्रमुख उमेदवार
उमेदवाराचे नाव कंसात मतदारसंघ
- मूकांबिका (उदुमलपेट)
- पाझा कारुपैया(नगर)
- श्रीप्रिया (माइलापुर)
- शरद बाबू (अलानदुर)
- डॉ. संतोष बाबू (वेलाचेरी)
- डॉ. आर महेंद्रन (सिगनाल्लुर)
- कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून डॉ. शुभ्रा चार्ल्स यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कमल हासन यांनी आपले दिवंगत वडील श्रीनिवासन यांना स्मरुन विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांच्या मतदारसंघातील उमेदवार आपल्याला नक्कीच विधानसभेत पाठवतील. जेणेकरुन आपल्या मतदारसंघातील समस्या, प्रश्न आणि विचार ते विधिमंडळात मांडतील. (हेही वाचा, Tamil Nadu Assembly Election 2021: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी DMK, काँग्रेस यांचे जागावाटप जाहीर)
2021 சட்டமன்ற தேர்தலில் நம் கட்சியின் சார்பாக போட்டியிடும் இரண்டாம்கட்ட வேட்பாளர்களை தலைவர் திரு. @ikamalhaasan அவர்கள் அறிவித்தார்.#நம்ம_சின்னம்_டார்ச்_லைட்#தமிழகம்_விற்பனைக்கு_அல்ல#சீரமைப்போம்_தமிழகத்தை pic.twitter.com/5mvw6oiFxo
— Makkal Needhi Maiam | மக்கள் நீதி மய்யம் (@maiamofficial) March 12, 2021
अभिनेता ते नेता असा प्रवास केलेले कमल हासन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्या वडीलांचे एक स्वप्न होते. मी आयएएस अधिकारी बनावे. त्यानंतर राजकारणात यावे. मी त्यांचे आयएएस बणण्याचे स्वप्न तर पूर्ण नाही करु शकलो. परंतू, माझ्या पक्षात अनेक माजी आययएएस अधिकारी आहेत. ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका पार पडत आहेत.
तामिळनाडू राज्यात विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. या ठिकाणी सध्या ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम (AIADMK) पक्षाचे सरकार आहे. या पक्षाचे ई पलानीस्वामी हे मुख्यमंत्री आहेत. या आधिच्या निवडणुकीत AIADMK ने 136 आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डीएमके ने 89 जागांवर विजय मिळवला आहे. बहुमतासाठी या राज्यात 118 जागा आवश्यक असतात.