Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

दिल्ली-एनसीआर (Delhi NCR) परिसरात सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के (Delhi-NCR Earthquake) जाणवले, त्यामुळे दिल्ली, नोएडा (Noida), ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद (Ghaziabad) येथील उंच इमारतींमधील रहिवासी घाबरून बाहेर पळाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5.36 वाजता धौला कुआं येथील दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळ पाच किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. सुदैवाने, कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, भूकंपाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तातडीने एक संदेश जारी करत दिल्लीतल नागरिकांसाठी शांतता, निश्चिंतता बाळगण्याचे अवाहन केले. अधिकारी आवश्यक ती खबरदारी घेऊन कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे मात्र, घाबरुन जाऊ नये असेही ते म्हणाले.

दिल्ली-एनसीआर हादरल्याने रहिवासी घाबरले

प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, भूकंपासोबत मोठा आवाज आल्याचे सांगितले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका विक्रेत्याने सांगितले की, जमीन हादरत होती आणि सर्व काही हालत होते. नागरिक ओरडत होते, काही नागरिकांना काहीतरी कोसळल्याचे जाणवले त्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि ते रिकाम्या जागेवर धावू लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अधिकाऱ्यांकडून तत्काळ प्रतिसाद

भूकंपाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे अवाहन केले आहे. त्यांनी आपल्या एक्स (जुने ट्विटर) हँडलवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, दिल्ली आणि जवळच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन, संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (हेही वाचा, Earthquake in Caribbean Sea: कॅमन बेटांच्या दक्षिणपश्चिम समुद्रात 7.6 मॅग्निट्यूडचा भूकंप, पुर येण्याची शक्यता)

पंतप्रधानांकडून अवाहन

दिल्ली पोलिसांनी X वर पोस्ट करून नागरिकांना धीर दिला: आम्हाला आशा आहे की आपण सर्वजण सुरक्षित असाल. कोणतीही आवस्यकता, गरजभासल्यास नागरिकांनी आपत्कालीन 112 हेल्पलाइनचा वापर करावा असा सल्लाही पोलिसांनी दिला. (हेही वाचा, Badlapur News: बदलापूरात जाणवले भूकंपाचे धक्के? नागरिकात भीतीचे वातावरण, पाहा नेमकं काय घडले)

दिल्लीचा भूकंपाचा इतिहास आणि जोखीम ठरणारे घटक

दिल्ली-एनसीआर पासून हिमालय 250 किलोमीटर अंतरावर असल्याने, येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. यापूर्वी, 23 जानेवारी रोजी, चीनमधील शिनजियांग येथे 80 किलोमीटर खोलीवर 7.2 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले होते. याव्यतिरिक्त, 11 जानेवारी रोजी अफगाणिस्तानात 6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे या प्रदेशात सौम्य भूकंप झाले.

नागरी संस्थेकडून पुष्टी

दिल्ली-एनसीआरमध्ये नजिकच्या काळात घडलेले भूकंप:

12 एप्रिल 2020: 3.5 तीव्रतेचा भूकंप

10 मे 2020: ईशान्य दिल्लीत 3.4 तीव्रतेचा भूकंप

29 मे 2020: रोहतकजवळ 4.4 तीव्रतेचा भूकंप

दरम्यान, भूकंपीय क्षेत्र 4 मध्ये असल्याने, दिल्लीला भूकंपांसाठी मध्यम ते उच्च जोखीम क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले आहे. भविष्यातील भूकंपाच्या घटनांसाठी सज्जता आणि सुरक्षा उपायांचे पालन करण्याची गरज यावर तज्ज्ञ भर देतात.