कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये रूतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून महसुल देणारी दारू विक्री पुन्हा सुरू करण्याचा विचार अनेक राज्यांनी केला. पण सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने आता तो मागे घेण्याची नामुश्की अनेक ठिकाणी आली. दरम्यान दुकानात दारूविक्री ऐवजी त्याची अप्रत्यक्ष विक्री किंवा होम डिलेव्हरीचा विचार राज्य सरकारने करावा असा सल्ला आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी आज सर्वोच्च न्यायालयात लॉकडाऊन दरम्यान दारूविक्री सुरू करण्याला परवानगी मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा सल्ला दिला आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत कोणतीही थेट ऑर्डर काढू शकत नाही पण राज्य सरकारने दारूच्या विक्रीसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत होम डिलेव्हरीच्या पर्यायने दारू विक्री सुरू करता येते का? हे पहावं असं म्हणाले. Lockdown: दारूसाठी दुकांनासमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा: दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रात तळीरामांच्या लांबच लांब रांगा; Watch Video.
4 मे पासून सुरू झालेल्या भारतातील लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबतच दारूची दुकानं उघडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र यावेळेस नागरिकांनी झुंबड केली. सरकारकडून आदेश देताना स्पष्टता न दिल्याने ही गर्दी सामान्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरू नये यासाठी काही जनहित याचिका सादर करण्यात आल्या. त्यावर सुनावणी करताना याबाबत चर्चा झाली. दिल्ली: 70 % महाग दारू विकत घेऊन आम्ही केजरीवाल सरकारची मदत करतोय; मद्यप्रेमी ग्राहकाने मुख्यमंत्र्यांना सुनावले (Watch Video).
ANI Tweet
"We will not pass any order but the states should consider indirect sale/home delivery of liquor to maintain social distancing norms and standards", Justice Ashok Bhushan, heading the bench said. https://t.co/qCb6B9NMx0
— ANI (@ANI) May 8, 2020
न्यायमूर्ती संजय किशन कौल या खंडपीठाच्या न्यायमूर्तींपैकी एक असलेल्यांनी होम डिलेव्हरीबद्दल चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. मुंबई शहरात दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर देशात काही ठिकाणी टोकन देऊन दारू विकण्याचा प्रयत्न केला होता.