Customer standing In Line For Alcohol Purchase (Photo Credits: ANI)

नवी दिल्ली: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन (Lockdown) असताना ठप्प झालेल्या अर्थचक्राला निदान सुरु करण्यासाठी देशातील दारू विक्रीला (Alcohol Sell) परवानगी देण्यात आली होती. मात्र ही दारूची दुकाने उघडताच जवळपास दीड  महिन्यापासून वाट पाहत असणारे मद्यपी तुफान गर्दी करू लागले, परिणामी या निर्णयाच्याअंमलबजावणी बाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे. अशात दिल्ली मध्ये मात्र दारूची विक्री अजूनही सुरु आहे, मात्र गर्दीला रोख बसवण्यासाठी दारू ही 70 टक्के अधिक भाव ठेवून विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे तरीही गर्दी ओसरताना दिसत नाही. उलट या गर्दीतील एका मद्यप्रेमी ग्राहकाने आपण ही दारू खरेदी करून मुख्यमंत्री केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची आणि एकूणच सरकारची मदत करत आहोत असा दावा केला आहे. या मद्यप्रेमींचा एक व्हिडीओ सुद्धा ANI वर पाहायला मिळत आहे. Lockdown: राज्य सरकारच्या निर्णयावरून आंध्र प्रदेशातील महिला आक्रमक; दारू विक्रीच्या विरोधात रसत्यावर उतरून केले आंदोलन

दिल्ली मधील कृष्णानगर परिसरात दारूच्या दुकानाबाहेर लावलेल्या रांगेत उभ्या असणाऱ्या एका ग्राहकाने केजरीवाल यांना सुनावले आहे. आम्ही ही दारूची खरेदी पिण्यासाठी नाही तर या सरकारची मदत व्हावी म्हणून करत आहोत, यांनी दारू 70  टक्के महाग केली गरिबांच्या बाबत विचारही केला नाही, भारतात एवढे पैसे असूनही लोकांकडे मदत मागितली जातेय, चार दिवसातच यांची हिंमत संपली. अशावेळी मदत म्हणून आम्ही दारू खरेदी करतोय. असा दावा या ग्राहकाने केला आहे.

तसेच दारूविक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयवरूनही त्याने भाष्य केले. या कोरोनाच्या संकटकाळात दारूची दुकाने सुरु करायची गरज नव्हती. याचे परिणाम याच महिन्यात दिसून येतील आणि ते फार गंभीर असतील अशी शक्यताही त्याने वर्तवली आहे.

ANI ट्विट, पहा व्हिडीओ

दरम्यान, दिल्ली मध्ये दारूची दुकाने सुरु होताच पहिल्या दिवसापासून लोकांनी गर्दी केली होती, अनेकठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवून लोक दारू खरेदीसाठी गर्दी करत होते, परिणामी काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दीला नियंत्रणात आणावे लागले होते. दारूसाठी आता 70% दर वाढवल्याने म्हणेजच जेव्हा 500 रुपयांच्या दारूसाठी 850 रुपये भरावे लागत असताना सुद्धा सकाळी दुकान उघडल्यापासून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.