देशभरात आजपासून लॉकडाऊन (Lockdown) 3.0 सुरु झाले आहे. दरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) महिला आक्रमक झाल्या असून दारु विक्री विरोधात आंदोलन केले आहे. भाजीपाला बाजारपेठा फक्त 3 तास खुल्या राहतात. मात्र, दारुचे दुकाने 7 तास उघडे ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे विशाखापट्टणम येथील स्थानिक महिलांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जवळपास दीड महिना अधिकृत दारू विक्री बंद होती. मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरयाणा, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांनी दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी परवानगीमुळे लॉकडाऊनच्या आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात दारूचा व्यवसाय तेजीत आला आहे. एवढेच नव्हेतर, सोमवार 4 एप्रिलपासून एनेक ठिकांणी तळीरामांनी दारू खरेदीसाठी लांबच लांब रागा पाहायला मिळत आहे. परंतु, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आंध्र प्रदेशातील महिलांना विरोध दर्शवला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाजीपाला बाजारपेठा 3 तास सुरु ठेवली जात आहे. परतु, दारूची दुकाने 7 तास खुली ठेवण्याची परवानगी का? असा पश्न आंदोलनकर्त्या एका महिलेने उपस्थित केला आहे.

एएनआयचे ट्विट-

कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण देशात पसरत चालले आहे. मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही भागात दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसते आहे. परिणामी, दिल्ली, जयपूर आणि मुंबईतील अनेक भागातील वॉईन शॉप दुपारच्या दरम्यान बंद करण्यात आली आहेत. हे देखील वाचा- Lockdown: सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री; लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

दारूच्या दुकाना बाहेर Social Distancing पाळण्यासाठी ग्राहकांची अनोखी शक्कल; पाहा व्हिडिओ - Watch Video

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतातच हाहाकार माजवला आहे. आंध्र प्रदेशात आतापर्यंत 1 हजार 650 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 524 जणांना कोरोनावर मात केली आहे.