Sputnik Light ला भारतातील Phase-3 च्या ट्रायलसाठी मिळाली परवानगी
Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

भारतात सुरु असलेल्या लसीकरणासंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. कारण रशियाची स्पुटनिक लाइटला (Sputnik Light) भारतातील तिसऱ्या टप्प्यातील ब्रिजिंग ट्रायलला मंजूरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया (DCGI) ने भारतातील लोकसंख्येवर लसीकरणाच्या परिक्षणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. DGCI च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने नुकतीच स्पुटनिक लाइटच्या ट्रायलची सिफारिश केली होती.

DGCI ने भारतीय स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील ब्रिजिंग ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी जुलै मध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी ऑफ द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (CDSCO) ने स्पुटनिक लाइटच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यास नकार दिला गेला होता. CDSCO ने रशियाच्या लसीसाठी स्थानक ट्रायलसाठी जरुरी असल्याचे सांगितले होते.(Multisystem Inflammatory Syndrome म्हणजे काय? जाणून घ्या कोविड 19 च्या लहान मुलांमधील संसर्गानंतर जडणार्‍या या दुर्मिळ आजाराबद्दल!)

स्पुटनिक लाइट ही स्पुटनिक V च्या कंपोनेट-1 डेटा सारखा होता. तसेच, भारतीय लोकसंख्येतील त्याची सुरक्षा आणि रोगप्रतिकारक्षमता डेटा चाचणीमध्ये आधीच प्राप्त झाला होता. डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) सोबत गेल्या वर्षी भारतात स्पूनटिक व्हीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करार केला होता.

द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार असे सुचवले आहे की कोविड -19 च्या विरूद्ध स्पुतनिक लाइटने 78.6-83.7 टक्के प्रभावीता दर्शविली आहे. हे दोन-डोस लसीच्या उमेदवारांपेक्षा अधिक आहे. अर्जेंटिनामधील किमान 40 हजार वृद्धांवर हा अभ्यास करण्यात आला.