
सिद्धू मूसे वाला हत्याकांड (Sidhu Moose Wala Murder) प्रकरणात मस्टरमाइंड (MastermindI) सचिन विश्नोई (Sachin Bishnoi) याला अजरबैजान येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन बिश्नोई याच्याव सिद्दू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी होती. सचिन बिश्नोई याचा फेक पासपोर्ट (Fake Passport) दिल्ली येथील संगम विहार (Delhi Sangam Vihar) परिसरातील एका पत्त्यावर बनला होता. सिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला यांची हत्या भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आपल्या मावशीला भेटण्यासाठी तिच्या गावी जात असताना मुसे वाला यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केला होता. या वेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. त्यानंतर पंजाब पोलीसांनी केलेल्या कारवाईत अनेक शार्प शूटर्स मारले गेले.
प्राप्त माहितीनुसार, सचिन याच्याकडून एक खोटा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. सचिन आपले पूर्ण नाव सचिन थापन असे लिहीत असे. त्याच्याकडून तिलक राज टूटेजा नावाने असलेला पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. सचिन याच्या वडीलांचे खरे नाव शिव दत्त आहे. त्याच्या खोट्या पासपोर्टमध्ये त्याच्या खऱ्या वडीलांचेही नाव लिहीण्यात आले आहे. (हेही वाचा, Punjab Encounter: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला प्रकरणातील दोन संशयीत पोलीस चकमकीत ठार, अमृतसर जवळील कलानौर गावात थरार)
सचिन याच्या पासपोर्टवर असलेला पत्ताही खोटा आहे. त्याचा खरा पत्ता व्हीपीओ दतारिया वाली, जिल्हा फजिल्का असा आहे. त्याने त्याच्या पासपोर्टवर घर क्रमांक 330, ब्लॉक एफ-3, संगम विहार, दिल्ली असे दिले आहे. पोलिसांचा दावा आहे की, सचिन याच्या सांगण्यावरुन त्याचा मित्र संदीप उर्फ केकडा याने सिद्धू मूसेवाला यांच्या घराचीही रेकी केली होती. घटना घडली त्या दिवशी केकडा सिद्धू मूसेवाला याचा चाहता बनून त्याच्या घरी पोहोचला होता.
पंजाबी गायक मूसे वाला हे तरुणाईमध्ये अधिक लोकप्रिय होते. त्यांच्या गाण्याचे अनेक अल्बम प्रसारीत झाले आहेत. खास करुन पार्टी आणि जाहीर कार्यक्रमातही मूसेवाला यांची गाणी वाजवली जात असत. ते काँग्रेस पक्षाचे सक्रीय नेते होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पंजाब विधानसभेसाठी निवडणूकही लढवली होती. त्यांना त्यात यश आले नाही. मूसेवाला यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये जाऊन मूसेवाला यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली होती.