Sidhu Moose Wala (Photo Credit - Social Media)

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला ( Punjabi Singer Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील दोन संशयीत आरोपी पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत (Punjab Encounter) ठार झाले आहेत. जगरुप आणि मनप्रीत उर्फ मन्नू अशी या दोघांची नावे आहेत. या चकमकीत तीन पोलीसही जखमी झाले आहेत. अमृतसर (Amritsar) येथील भकना कलानौर (Kalanaur) गावात ही घटना घडली. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. मनप्रीत हा तो शूटर आहे. ज्याने AK-47 च्या माध्यमातून पहिली गोळी सिद्धू मूसेवाला यांच्यावर झाडली होती.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कनाडायेथे बसलेला गँगस्टर गोल्डी बरार याने दिलेल्या आदेशावरुन मनप्रीत याने मूसेवाला यांच्यावर गोळी झाडली. गोल्डी बरार याचा स्पष्ट आदेश होता की मूसेवाला यांच्यावर पहिली गोळी हा मनप्रीतच झाडेन. दरम्यान, जेव्हा मनप्रीत जेव्हा बंजापच्या कारागृहात बंद होता तेव्हा पटियाला गँगच्या सदस्यांनी त्याला चप्पल आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. या हाणामारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुनच पटियाला गँगला धडा शिकविण्यासाठी आणि बदला घेण्याच्या उद्देशाने मनप्रीत याने गोल्डी बरार याच्याकडे पहिली गोळी झाडण्याची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणेच पहिली गोळीही मनप्रीतनेच चालवली. या प्रकरणातील तीसरा दीपक मुंडी अद्याप फरार आहे.

ट्विट

दरम्यान, मूसेवाला प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात सिंगर सिद्धू मूसेवाला यांना मारल्यानंतर त्यांच्या हल्लेखोर आनंद साजरा करत होते. हा व्हिडिओ शूटरकडूनच जप्त केला होता. यात पाच लोक एका कारमधून जाताना दिसतात. सर्वजण हसत आहेत. तसेच, कॅमेऱ्यासमोर येऊन बंदुकाही उंचावताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेला कारमधील सर्वात पुढच्या सीटवर निळ्या रंगाच्या शर्टमध्ये शूटर प्रियव्रत फौजी दिसत आहे. पाठिमागच्या सिटवर चेक शर्टमध्ये दिसत आहे तो अंकित आहे. हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या सर्वात कमी वयाचा शूटर अंकित सिरसा याचा फोन स्कॅन केल्यानंतर हा व्हिडिओ पुढेआला आहे. यात अंकित आणि सचिन यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित, सजायफ्ता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे.