पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder Case) पंजाब पोलिसांनी आठ शूटर्सची ओळख पटवली होती. यापैकी एक शूटर सौरभ उर्फ महाकाल (Saurav Mahakal) याला बुधवारी महाराष्ट्रातील पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील फरार आरोपी सौरभ उर्फ महाकाल याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरभ उर्फ महाकालचे खरे नाव सिद्धेश कांबळे आहे. सौरभ उर्फ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने मोक्का प्रकरणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने महाकालला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सौरभ महाकाल अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीचा शूटर संतोष जाधव याच्यासोबत मूसेवालाला मारण्यासाठी पंजाबमध्ये आला होता. मुसेवाला खून प्रकरणातील मुख्य शूटर महाकाल याच्यावर पुणे ग्रामीणमध्ये ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या हत्येसह मोक्का अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. शूटर संतोष जाधव याने त्याच्या साथीदारांसह मंचर परिसरात ओंकारची भरदिवसा हत्या केली होती, ज्यामध्ये 302 120 बी 34 आर्म्स ऍक्ट 3, 25 27 आणि कलम 3 (1) 3 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, ओंकारच्या हत्येनंतर संतोष जाधव विरुद्ध वॉरंट असताना सौरव महाकालने त्याला आपल्या इथे आश्रय दिला होता.
तेव्हापासून पोलीस महाकालचाही शोध घेत होते, दरम्यान, मूसेवाला हत्याकांडातील शूटर म्हणून महाकालचे नाव पुढे आले, त्यानंतर पोलीस पुन्हा सक्रिय झाले. महाकाल हा पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मणेर येथे लपल्याची गुप्त माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून अटक करून आज पुण्यातील शिवाजीनगर येथील मोक्को न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने महाकालला 20 जूनपर्यंत कोठडी दिली आहे. (हेही वाचा: Delhi: CISFची मोठी कारवाई, मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीकडून 2.7 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त)
आठ शूटर्सबद्दल माहिती देताना पंजाब पोलिसांनी सांगितले होते की, त्यापैकी दोन महाराष्ट्रातील पुण्याचे रहिवासी आहेत. 3 शूटर पंजाबचे रहिवासी आहेत. 2 हरियाणातील असून एक शूटर राजस्थानचा आहे. सर्व शूटर्स लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या शूटर्सच्या शोधात पंजाब पोलिसांनी संबंधित राज्यांच्या पोलिसांची मदत मागितली होती.