Sheena Bora Murder Case: शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला
Indrani Mukerjea (Photo Credit: PTI/File)

शीना बोरा हत्या (Sheena Bora Murder Case) प्रकरणात अटक झालेल्या इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटळला आहे. इंद्रानी मुखर्जी यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंततर आता आपण सर्वोच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठवणार आहोत, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. सन 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना जामीन मिळाला नाही.

पाठिमागील वर्षीही मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्रानी यांची याचिका फेटाळली होती. त्या वेळी जामीन अर्ज फेटळताना म्हटले होते की, जामीनावर सुटका झाल्यास आरोपीकडून साक्षीदार आणि तक्रारदारांवर दबाव टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायाधीशांनी पुढे म्हटले होते की, यात कोणताही संशय नाही की, आरोपी अत्यंत प्रभावशाली आणि श्रीमंत आहे. त्यामुळे आरोपीने साक्षीदारांवर दबाव अथवा प्रभाव टाकण्याच्या शक्यतेस अधिक पुष्टी मिळते. (हेही वाचा, मुंबई : Indrani Mukerjea सह भायखळा कारागृहामध्ये 38 जण कोरोनाबाधित)

वैद्यकीय कारण पुढे करत इंद्राणी मुखर्जी यांनी अनेक वेळा न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यात अपयश आल्यानंतर इतर काही गुण दोषांवर जामीन देण्याची मागणी इंद्राणीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शीना बोरा हत्या प्रकरणात सीबीआयने आपला तपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात शीनाची आई आणि माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी मात्र, या प्रकरणाचा सामना न्यायालयात करत आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, तपास यंत्रणांनी मुंबईत विशेष न्यायालयात म्हटले की, 2012 मध्ये झालेल्या या हत्या प्रकरणाचा पुरेसा तपास झाला आहे.

सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपत्रं आणि तोन पुरवणी आरोपपत्रं दाखल केली आहेत. ज्यात इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा चालक श्यामवर राय, माजी पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांना आरोपी करण्यात आले आहे. इंद्राणीक यांना सन 2015 मध्ये शीना बोरा हत्या प्रकरणात अटक करण्यात आले होते. शीना ही इंद्राणीची आगोदरच्या लग्नापासून झालेली मुलगी होती.