घृणास्पद! झारखंड मध्ये 50 वर्षीय विधवेवर केला सामूहिक बलात्कार, पीडित महिलेच्या गुप्तांगात घुसवला स्टीलचा ग्लास
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

बलात्कार करणा-यांवर कठोरातले कठोर शासन होऊन सुद्धा या घटना अजून देशात घडतच आहे. झारखंड (Jharkhand) मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण ऐकून तर अक्षरश: तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. झारखंडमध्ये हंटरगंज प्रखंड गावातील ही घटना आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, येथे एका 50 वर्षीय विधवेवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे आरोपी बलात्कार इतके करुन थांबले नाही. तर त्यांनी त्या महिलेच्या गुप्तांगात स्टीलचा ग्लास घुसवून क्रूरतेचा कळस गाठला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हंटरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामूहिक बलात्कार झालेल्या या पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हेदेखील वाचा- Honour Killing: मिर्जापूर येथे शेजारी राहणाऱ्या परजातीच्या तरूणासोबत जुळले प्रेम; आई-वडिलांनी ओढणीने गळा आवळून केली अल्पवयीन मुलीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (7 जानेवारी 2021) रात्री 11 वाजताच्या सुमारास तीन तरुणांनी या गावातील 50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टिलचा ग्लास घुसवला. या घटनेत पीडिता अत्यंत गंभीर जखमी झाली आहे. पीडित महिलेवर हंटरगंज सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. रुग्णालयाचे प्रभारी आरोग्य पदाधिकारी डॉ. वेदप्रकाश यांनी सांगितलं की, पीडितेची स्थिती अत्यंत गंभीर आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या क्रूर घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान येथील पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. असे सांगितले जात आहे की, एका तरुणाने आपल्या घरी डिजे चा मोठा आवाज करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.