
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मिर्जापूर (Mirzapur) परिसरात आई-वडिलांनी मिळून आपल्याच मुलीच हत्या (Honour Killing) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेम जुळले होते. यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल, या भीतीने ग्रासलेल्या आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीची हत्या केली आहे, असे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.
मिर्जापुरच्या जमालपूर गावात राहणाऱ्या एका मुलीचे शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती मुलीच्या आई- वडिलांना झाली. यामुळे आपल्या समाजित प्रतिष्ठेला धक्का बसण्याची भिती मुलींच्या आई-वडिलांना होती. याच रागातून दोघांनी मिळून तरूणीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. तसेच तरूणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जवळील शेतात नेऊन फेकला. दरम्यान, 5 जानेवारी जमालपूरच्या एका शेतात 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिच्याच आई वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा-उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मध्ये Dolphin ची काठी, कुर्हाडी ने मारून अमानुष हत्या; Viral Video नंतर 3 जण अटकेत
ऑनर किलिंग प्रकरणात दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. ऑनर किलिंग प्रकरणात फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या विधेयकात विवाहित जोडप्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्ष तुरुंवास किंवा जन्मठेपेची शिक्षा करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने 17 जुलै रोजी घेतलेल्या निर्णयात यासंदर्भात कायद्याची शिफारस केली आहे.