चैन्नई पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये “wife swapping” चा प्रकार केला जात होता. दरम्यान कारवाई मध्ये पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. हे रॅकेट मागील 8 वर्षांपासून सुरू होते. सिंगल असलेल्या पुरूषांना टार्गेट करून त्यांना wife-swapping parties चं आमिष दाखवलं जातं होतं. TOI ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडीया वर पार्ट्यांचे प्रमोशन देखील केले जात होते. अटक केलेल्यांची नावं Senthil Kumar, Kumar, Chandramohan, Sankar, Velraj, Perarasan, Selvan, आणि Venkatesh Kumar आहेत. यांच्यावर “wife-swapping” parties चं आयोजन केल्याचे आरोप आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, धाड टाकण्याची कारवाई ही शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे. चैन्नई मधील Panaiyur on East Coast Road (ECR) वर ही कारवाई केली आहे. शेजार्यांच्या तक्रारीवरून त्यांना मोठ्या संख्येमध्ये एका घरात पुरूष जाताना दिसले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नक्की वाचा: मुंबई: Wife Swapping प्रकरणात बिझनेसमनचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला .
“wife swapping” च्या नावाखाली सिंगल पुरूषांना लक्ष्य करून आरोपी काही स्त्रियांना त्यांच्या पत्नी म्हणून समोर आणत होते. नंतर त्यांना पार्टनरची अदलाबदल करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. पुरुषांकडून 13-25 हजार रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करुन दिली जात होती. एका महिलेच्या जाळ्यात तो पुरुष अडकला की त्याला इतर महिलांचं देखील आमिषही दाखवलं जात होते. धाडेमध्ये चैन्नई पोलिसांनी घटनास्थळावरुन या आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये 30-40 वयोगटातील महिलांची सुटका करण्यात आली. या महिला विवाहित असून त्यांना पैशांचं आमिष दाखवलं गेलं होतं असेही रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.