मुंबई: Wife Swapping प्रकरणात बिझनेसमनचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला
Wife Swapping | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

वाईफ स्वॅपिंग (Wife Swapping) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका बिझनेसमनचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हा बिझनेसमन मुंबई (Mumbai) येथील आहे. पोलिसांनी त्याला तिन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याने न्यायालयाकडे जामीन मागितला होता. त्यावर, 'आरोपीने आपल्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी आपल्या पत्नीचा वापर केला. तिच्यावर त्याच्या तीन मित्रांनी बलात्कार केला. हे सर्व आरोपीच्या संमतीने घडले. आरोपीच्या ठिकाणी दुसरा कोणताही सामान्य पती असता तर त्याने असे वर्तन केले नसते' असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी बिझनेसमनचा जामीन अर्ज फेटाळला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने आोरपीचा जामीन फेटाळताना त्याच्या पत्नीच्या आरोपांचा हवाला दिला. आरोपीने आपल्या पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवले. त्यानंतर आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास तिला प्रवृत्त केल्याचे न्यायालयाने आरोपीच्या निदर्शनास आणले. आरोपीच्या जामीन अर्जाला तक्रारदार महिलेने (बिझनेसमनची पत्नी) आपल्या वकिलामार्फत विरोध दर्शवला होता.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार महिलेच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत हा प्रकार 2017 मध्येच घडला होता. मात्र, तिने या प्रकरणी साधारण 2 वर्षांनंतर तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकारामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे सावरण्यास तीला बराच काळ लागला. त्यामुळेच तिने इतक्या उशीरा तक्रार नोंदवली. (हेही वाचा, नववधू पळाली अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन, सॉफ्टवेयर इंजीनियर पती म्हणाला 'बायकोचे लग्नाआधीच होते अफेअर')

दरम्यान, बिझनेसमनने आपल्या पत्नीचा आरोप फेटाळून लावताना म्हटले की, माझी पत्ना माझ्यापासून संतृष्ट नव्हती. त्यामुळे तिने तिच्या संमतीने दुसऱ्या पुरुषाची निवड केली. मात्र, आरोपीचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले की, शरीरसंबंधाचा विचार करु पाहात महिलांच्या तुलनेत पुरुष हे अधिक आक्रमक असतात. त्यामुळे आरोपीने केलेल्या आरोपानुसार जर त्याची पत्नी त्याच्यापासून संतृष्ट नसती तर, तिने त्याच्या नकळत गुप्तपने संतृष्टी मिळवण्याचा मार्ग निवडला असता. तिने आपल्या पतीलाच आपल्यासाठी दुसरा पुरुष शोधण्यास सांगितले नसते.

नवऱ्याने आपल्या पत्नीचा परपुरुषासोबतच्या शरीरसंबंधांची एक ध्वनीचित्रफीतही बनवली. यातून त्याचा आपल्या पत्नीला दबावात ठेवण्याचा उद्देश स्पष्ट होतो, असे सांगत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात डिसेंबर 2019 मध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.