Serum Institute कडून देशाबाहेर लसीचे उत्पादन करण्याचा विचार- रिपोर्ट्स
Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

भारतात कोरोनाची लस तयार करणारी संस्था सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute) आता देशाबाहेर सुद्धा काम करणार आहे. खरंतर ब्रिटिश मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत कोविशिल्ड लस तयार करणारी सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी याबद्द माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भारताव्यतिरिक्त दुसऱ्या देशात सुद्धा कोरोनाची लस तयार करण्याचा विचार करत आहे. पूनावाला यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, 6 महिन्यांच्या आतमध्ये इंस्टिट्युटची प्रोडक्शन क्षमता वाढवली जाणार असून एका वर्षात 2.5 बिलियन ते 3 बिलियन डोसचा उत्पादन करु शकणार आहे.

सरकारकडून CEO अदार पुनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, Y दर्जाची सुरक्षेत एकूण 11 सुरक्षारक्षकांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये एक किंवा दोन कमांडो आणि अन्य पोलीस कर्मचारी असणार आहेत. ही घोषणा अशावेळी करण्यात आली जेव्हा सीरम इंस्टिट्युटने राज्यांसाठी कोविशिल्ड लसीच्या किंमतीत घट करण्याचे जाहीर केले.(Covid 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 4 लाखापेक्षा अधिकांना कोविड 19 चे निदान; जगात दिवसभरातील सर्वात मोठी रूग्णवाढ)

Tweet:

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून लसीच्या तुटवड्यामुळे काही समस्या उद्भवत आहेत. तर भारतीय कंपन्या लसींचे उत्पादन वाढवत असून ते देशासह जगभरात त्याची उपलब्धता निर्माण करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशाच्या आत्मकेंद्रित विचारामुळे त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या आहेत. या देशांनी कच्चा माल निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.