Covid 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 4 लाखापेक्षा अधिकांना कोविड 19 चे निदान; जगात दिवसभरातील सर्वात मोठी रूग्णवाढ
COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

भारत आज ( 1 मे) मागील 24 तासांत देशातील सर्वात मोठी कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करणारा दिवस ठरला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या मागील 24 तासांमधील संख्या 4,01,993 आहे. तर कोविड 19 मुळे 3,523 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही जगातील सर्वात मोठी दिवसभरातील रूग्णवाढ आहे. यामुळे एकुण कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटींच्या जवळ पोहचली आहे तर देशात अ‍ॅक्टिव्ह कोरोनारूग्ण 32 लाखांच्या जवळ आहे.

ICMR च्या माहितीनुसार, आतापर्यंत 28,83,37,385 कोविड सॅम्पल तपासण्यात आले असून काल 19,45,299 कोविड 19 चे सॅम्पल तपासण्यात आले आहेत. सध्या देशात कोविड 19 ची दुसरी लाट धुमाकूळ घालत असल्याने सारीच राज्यं अलर्ट वर राहून काम करत आहेत. Covid Vaccine for 18+: भारतामध्ये 18-44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात; मुंबई मध्येही आज 5 केंद्रांवर तरूणाईला मिळणार लस.

ANI Tweet

दरम्यान भारतामध्ये आजपासूनच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता लसीकरण वेगवान करण्यात आले आहे. भारतामध्ये आता कोविन अ‍ॅप च्या माध्यमातून नागरिकांना रजिस्ट्रेशन करून नजिकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन कोविड 19 ची लस टोचून घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत तर रशियाची स्फुटनिक वी या लसीला देखील मान्यता देण्यात आली असून त्याचे डोसही लवकरच वितरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.