आज 1 मे पासून भारतात 'वॉर अगेन्स्ट वायरस' ही लढाई 'लसीकरणाच्या माध्यमातून अधिक तीव्र करण्यात आली आहे. देशभर आता 18 वर्षांवरील सार्यांना सरसकट कोविड 19 ची लस (COVID 19 Vaccine) मिळणार आहे. दरम्यान मुंबई मध्ये 2 दिवसांपूर्वी लसींच्या तुटवड्यामुळे तातडीने तरूणांसाठी लस उपलब्ध नसेल असे सांगण्यात आले होते मात्र रात्री उशिरा मर्यादीत लसींचा पुरवठा आल्यानंतर बीएमसीने (BMC) 3 दिवसांसाठी स्थगित केलेला लसीकरणाचा कार्यक्रम आज पुन्हा सुरू केला आहे. मुंबई मध्ये आज 18-44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी 5 केंद्रं खुली असतील पण या केंद्रांवर कोविन अॅप द्वारा लॉगिंग केलेल्या काही मर्यादीत तरूण मंडळींनाच लस दिली जाईल असं सांगण्यात आले आहे. COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?
दरम्यान बीएमसीच्या परिपत्रकानुसार, आज 1 मे दिवशी मुंबई मध्ये बीकेसी, नायर हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, सेव्हन हिल्स आणि कूपर हॉस्पिटल या 5 केंद्रांवर लस उपलब्ध असेल. मात्र त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अत्यावश्यक आहे. वॉक ईन द्वारा लसीसाठी रजिस्ट्रेशन केले जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. हे लसीकरण दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्येच केले जाणार आहे.
बीएमसी ट्वीट
केवळ १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण १ मे रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर
कोविन ॲप वर नोंदणी केलेल्यांचेच होणार लसीकरण
लशींच्या साठा मोजकाच उपलब्ध झाल्यामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय#MyBMCUpdate pic.twitter.com/WatLK9urSx
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार कडून होणार आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे हे लसीकरण देखील सरकारी रूग्णांलयांमध्ये मोफत असणार आहे. राज्य सरकारच्या सोबतीने अनेक कंपन्यादेखील त्यांच्या नागरिकांचे लसीकरण करणार आहेत. यामध्ये रिलायंस फाऊंडेशन कडून एका विशेष उपक्रमाद्वारा त्यांच्या कर्मचार्यांचे आणि त्यांच्या परिवारातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.