
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच एका आरोपीच्या जामिनावर सुनावणी करताना विषारी सापाचा (Poisonous Snakes) हत्येसाठी वापर करण्यामध्ये वाढ झाल्याचं बोलून दाखवलं आहे. दरम्यान काल राजस्थान (Rajasthan) मध्ये एका वृद्ध महिलेच्या हत्येमध्ये विषारी सापाचा वापर केलेल्या आरोपीच्या जामीनावर सुनावणी करताना हे मत बोलून दाखवलं आहे. कृष्ण कुमार सोबत मनिष होता. त्यांनी प्रेयसीच्या सासूच्या हत्येसाठी विषारी साप विकत घेतला. दरम्यान यामध्ये त्यांनी कोर्टात जामीन मागितला आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्स नुसार, न्यायाधीश सुर्या कांत यांनी नोंदवलेल्या निदर्शनामध्ये 'विषारी सापाचा वापर करून सर्पदंशाने व्यक्ती दगावल्याचं दाखवत हत्या करण्याचं भासवलं जातं. सध्या हा ट्रेंड राजस्थान मध्ये वाढत आहे.' असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत सरन्यायाधीश एनवी रामण्णा आणि न्यायाधीश हिमा कोहली देखील होते. या खंडपीठाने आरोपीने हत्येसाठी हत्यार ( Murder Weapon)- साप पुरवल्याचा आरोप लावल्याने जामीन नाकारल्याचं सांगितलं आहे. सापासोबत रक्षाबंधन सेलिब्रेशन पडलं महागात, सर्पदंशाने मृत्यू; बिहारच्या छपरा मधील घटना.
2019 साली राजस्थान मध्ये झुंझुनू गावात सापाच्या मदतीने हत्या करण्यात आली. मनीषचं अल्पना सोबत अफेअर होते. तिने आर्मी जवान असलेल्या सचिन सोबत लग्न केले आहे. अल्पनाच्या सासूला जेव्हा अफेअर सोबत समजले तेव्हा तिचा काटा काढण्यासाठी प्रियकराच्या मदतीने अल्पनाने तिच्या हत्येचा कट रचला. यामध्ये सापाचा वापर करण्यात आला होता.
पोलिस तपासामध्ये अल्पना आणि मनिष मध्ये 124 कॉल्स झाल्याचं पहायला मिळालं. तर कुमार आणि अल्पना मध्ये 19 कॉल झाले होते. पोलिसांना यावरून सुगावा लागला. त्यानंतर 4 जानेवारी 2020 दिवशी या त्रिकुटाला अटक झाली आहे.