Man tries to tie rakhi to snake (Photo Credits: Twitter/@TusharSrilive)

भारतामध्ये काल रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण साजरा करण्यात आला. पण बिहार मध्ये या आनंदाच्या सणाला गालबोट लागलं आहे. एरवी गावामध्ये सर्पदंश (Snake Bite) झाल्यानंतर या व्यक्तीने अनेकांना वाचवलं होतं पण आता त्यालाच सापाने दंश केला आहे. या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ देखील वायरल होत आहे. सापाने या मुलाच्या पायावर दंश केला. मृत मुलगा हा शीतलपूर गावच्या दिगंबर साह चा 24 वर्षीय मुलगा मनमोहन उर्फ भुअ र होता. (नक्की वाचा: साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती).

मीडीया रिपोर्ट्स नुसार, मनमोहन उर्फ भुअर हा पेशाने शेतकरी होता. त्याला साप पाळण्याची खास हौस असते. जेथे कुठे साप आढळेल तिथे तो साप पकडायला जात असे. त्याच्यासोबत त्याने नाग-नागिणीचा जोडा ठेवला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा त्याची बहीण सुलोचनाने त्याला राखी बांधली तेव्हा भुअर ने तिला सापाला देखील राखी बांधायला सांगितलं. तेव्हा नागिणीने त्याला डसलं. त्याची तब्येत खालावत गेली. काही काळातच त्याचं निधन झालं.

साप भुअरला डसताच त्याने लोकांना त्यांना मारण्यापासून परावृत्त केले. त्याला दूर करण्याचा त्याने प्रयत्न केला. भुअर ला 3 लहान बहीणी आहेत. त्याच्यावर घराची जबाबदारी होती. वडिलांचे आजारपणात 2 वर्षांपूर्वी निधन झाले. सुलोचनाने  'जागरण' ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जेव्हा नागिणीला राखी बांढून ती आशिर्वाद घ्यायला गेली तेव्हा डंख मारला. भावापासून बहिणीची कायमची ताटातूट करून नियतीने क्रुर चेष्टा केली आहे.