Varavara Rao | (File Photo)

सर्वोच्च न्यायालयाकडून आज (10 ऑगस्ट) कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव (Varavara Rao) यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. वरावरा राव हे 2018 भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी होते. राव यांना वैद्यकीय बाबींवर नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना 28 ऑगस्ट 2018 दिवशी हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरामधून अटक करण्यात आली होती. राव यांना  इच्छेनुसार कुठेही वैद्यकीय उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना  ट्रायल कोर्टचा परिसर सोडण्यास परवानगी नाही. त्यांना मिळणार्‍या मोकळीकीचा त्यांनी केसमधील इतर आरोपींवर प्रभाव टाकण्यासाठी वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच एनआयए कडे त्यांना आपल्यावरील वैद्यकीय उपचारांची माहिती द्यावी लागणार आहे.

8 जानेवारी 2018 दिवशी पुण्याअत विश्रामबाग पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआर वरून सुरू असलेल्या ट्रायल्स मध्ये अटक करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्यावर Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीला ते नजरकैदेमध्ये होते. नंतर 17 नोव्हेंबर 2018 दिवशी त्यांना पोलिस कस्टडी मध्ये टाकण्यात आले. त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांची प्रकृती अनेकदा खालावली. त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाला होता. 80 पार असलेल्या राव यांना प्रकृतीच्या अनेक समस्या जाणवत होत्या. यामध्ये Neurological Problem सुद्धा आहेत. मुंबईत सेंट जॉर्ज मध्ये, नानावटी रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार झाले आहेत.

एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळेच भीमा कोरोगाव हिंसाचार घडल्याच्या आरोपाखाली वरावरा राव सह 9 जणांवर खटला सुरू आहे. सुरूवातीला पुणे पोलिसांकडे असलेला हा तपास आता NIA कडे देण्यात आला आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त काळ ते जेल मध्ये होते.