Dr Varavara Rao यांना नानावटी रूग्णालयात चाचणी व उपचारांसाठी हलवण्यास Bombay High Court ची परवानगी
Varavara Rao | (Photo Credits: PTI)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये NIA च्या ताब्यात असलेल्या डॉ. वरावरा राव (Dr Varavara Rao ) यांना आज (18 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान 81 वर्षीय वरावरा राव यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाचीदेखील लागण झाली होती. उपचारानंतर पुन्हा तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या राव यांना अनेक व्याधींनी ग्रासलेले आहे. वयोमानानुसार त्यांना थकवा आणि अन्य त्रास जाणवत आहेत. त्यामुळे राव कुटुंबाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. नक्की वाचा: avara Rao Health Updates: कोविड 19 ची लागण झालेल्या वरावरा राव यांना Neurological Problem सुद्धा; सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये स्पेशॅलिस्ट डॉक्टरांकडून उपचार

काल (17 नोव्हेंबर) दिवशी राव यांच्या प्रकरणावर ऑनलाईन सुनावणी सुरू होती. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक गोंधळ होत असल्याने आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रत्यक्ष सुनावणी झाली. त्यानंतर राव यांना राज्य सरकारच्या खर्चाने मुंबईतील नानावटी रूग्णालयात (Nanavati Hospital) उपचारांसाठी दाखल करावे असे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटता यावं यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र राव यांना कोर्टाला माहिती दिल्याशिवाय डिस्चार्ज दिला जाऊ शकत नाही असेदेखील म्हटलं आहे.

एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव सध्या अटकेत आहेत. एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळेच भीमा कोरोगाव हिंसाचार घडल्याच्या आरोपाखाली वरावरा राव सह 9 जणांवर खटला सुरू आहे. सुरूवातीला पुणे पोलिसांकडे असलेला हा तपास आता NIA कडे देण्यात आला आहे.