Varavara Rao (Photo Credits: Twitter/ ANI)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले 80 वर्षीय वरावरा राव (Varavara Rao) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कोविड 19 च्या उपचारासाठी त्यांना मुंबईमध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ( St George Hospital ) दाखल करण्यात आलं आहे. मात्र कोविड 19 सोबतच त्यांना आता न्युरॉलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत काही त्रास, आजार आहे.  त्यांंच्यावर उपचारासाठी स्पेशॅलिस्ट डॉक्टर बोलावण्यात आले आहेत अशी माहिती आज (17 जुलै) हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव सध्या अटकेत आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तळोजा कारागृहातून जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान काल त्यांची कोरोना चाचणेऐ पॉझिटीव्ह आल्यानंतर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले. वरावरा राव यांची प्रकृती कोविड 19 च्या आजाराबाबत स्थिर आहे. मात्र डॉक्टरांना या उपचारा दरम्यान त्यांना काही न्युरॉलॉजिकल प्रॉब्लेस असू शकतो असा संशय आहे. ज्यामुळे ते कोविड 19 शी संबंधित उपचारांमध्ये 'orientation'मध्ये पुरेसे प्रतिसाद देत नव्हते.

PTI Tweet 

वरावरा राव यांचा ईसीजी रिपोर्ट, एक्स रे रिपोर्ट उत्तम आहे. त्यांना श्वसनाचा त्रास नाही. कोविड बाबातच्या इतर पॅरामीटरवर त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र नेमका त्रास शोधण्यासाठी आता हॉस्पिटल त्यांचा सीटी स्कॅन करणार आहेत. सोमवार (13 जुलै) दिवशी तळोजा कारागृहात राव यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

राव यांच्या कुटुंबासोबतच काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य अशा सुमारे 2000 लोकांनी बॉम्बे हाय कोर्टामध्ये वरावरा राव यांना वैद्यकीय मदत आणि उपचार मिळावेत याकरिता तात्पुरता जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. तसेच महाराष्ट्र सरकारकडेही मागणी केली आहे.

एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळेच भीमा कोरोगाव हिंसाचार घडल्याच्या आरोपाखाली वरावरा राव सह 9 जणांवर खटला सुरू आहे. सुरूवातीला पुणे पोलिसांकडे असलेला हा तपास आता NIA कडे देण्यात आला आहे. 22 महिन्यांपेक्षा जास्त काळ राव तुरूंगात आहेत. दरम्यान देशातील कोविड 19 ची स्थिती पाहता त्यांनी जामिनासाठी स्पेशल NIA कोर्ट मध्ये अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला.