Bhima Koregaon Case: आरोपी वरावरा राव प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या जेजे रूग्णालयात दाखल; बॉम्बे हायकोर्टामध्ये जामीनासाठी याचिका
Varavara Rao (Photo Credits: Twitter/ ANI)

भीमा - कोरेगाव प्रकरणातील (Bhima Koregaon Case) आरोपी वरावरा राव (Varavara Rao) यांना सोमवार (13 जुलै) च्या रात्री प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबई मधील जेजे रूग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान तळोजा येथील कारागृहातून (Taloja Prison) त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगितले जात होते. या आरोग्याच्या तक्रारीवरूनच सुमारे 2000 लोकांच्या एका समुहाने बॉम्बे हाय कोर्टात त्यांना अंतरिम जामीन द्यावा यासाठी याचिका देखील केली आहे.

भीमा कोरोगाव हिंसाचारापूर्वी 31 डिसेंबर 2017 साली एल्गार परिषदेमध्ये कवी वरावरा यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषण आणि त्यांच्यावर माओवाद्यांशी असलेल्या संबंधांच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हा प्रकरणाचा तपास NIA कडे आहे. 28 मे पासून वरावरा राव तळोजा येथील कारागृहामध्ये आहेत. Bhima Koregaon Case: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वरावरा राव आणि शोमना सेन यांनी मागितलेला जामीन नामंजूर.

वरावरा राव रूग्णालयात 

शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी, वकिल अशा जनसामान्यांच्या एका समुहाने केलेल्या याचिकेमध्ये वरावरा राव यांना चालण्यास त्रास होत असून, शुद्ध हरपण्याचा त्रास होत असल्याचं सांगितले आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना दात घासण्यासारखी लहान सहान गोष्ट देखील स्वतःहून करता येत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान त्यांना जामीन देऊन उपचार घेण्यास मुभा द्यावी अशी विनंति करणारी याचिका काल दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वी देखील वरावरा राव सह भीमा कोरोगाव प्रकरणातील आरोपींनी देशातील कोरोनास्थिती पाहता जामीन देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता.