SBI Recruitment 2019 | (Photo credit: archived, edited, representative image)

बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण एसबीआय बँकेत 644 जागांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे एसबीआय बँकेत नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

12 जून ही अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. तर भारतात कोठेही तुम्हाला एसबीआयच्या शाखेत नोकरी लागण्याची संधी बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर हेड रिलेशनशिप मॅनेजर, सेंट्रल रिसर्च टीम, रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप एक्स्झिक्युटिव्ह, झोनल हेड सेल्स अशा विविध जागांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.

(आयआटीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! रेल्वेत प्रशिक्षणार्थीसाठी संधी)

तर अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गासाठी 750 रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्याऱ्यांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन या संधीचा फायदा घ्या.