भारतीय स्टेट बँकेने घोषणा केली आहे की, आता कार्डधारकांना EMI ट्रांजेक्शनसाठी 99 रुपये प्रोसेसिंग फी आणि त्यावर टॅक्स द्यावा लागणार आहे. हा नवा नियम येत्या 1 डिसेंबर 2021 पासून लागू केला जाणार आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना याबद्दल ईमेल करुन सांगितले आहे. ही प्रोसेसिंग फी, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून EMI च्या खरेदीवर वसूल करण्यात येणाऱ्या व्याजाप्रमाणे घेतली जाणार आहे. ईएमआय ट्रांजेक्शन रद्द झाल्यास प्रोसेसिंग फी परत केली जाणार आहे. बहुतांश बँका दीर्घकाळापासूनच ईएमआयच्या देवाणघेवाणीसाठी प्रोसेसिंग फी घेतात.
SBICPSL यांनी स्पष्ट केले आहे की, 1 डिसेंबर पूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही ट्रांजेक्शनवर प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही आहे. कंपनी रिटेल आउटलेटच्या खरेदीवर चार्ज स्लिच्या माध्यमातून कार्डधारकांना ईएमआयच्या ट्रांजेक्शनवर प्रोसेसिंग चार्ज बद्दल सांगणार आहे. समजा तुम्ही ईएमआय योजनेअंतर्गत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोबाईल फोन खरेदी केला आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरल्यास, कार्ड कंपनी तुमच्याकडून प्रक्रिया शुल्क आणि कर म्हणून रु. 99 आकारेल. हे शुल्क तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये EMI रकमेसह दिसेल.(तुमच्या Aadhar Card चा चुकीच्या पद्धतीने वापरत होत नाही ना? 'या' पद्धतीने तपासून पहा ऑथेंटिकेशन हिस्ट्री)
दरम्यान, भारतीय स्टेट बँकेच्या पेन्शनधारकांना 1 नोव्हेंबर पासून Video Life Certificate Service च्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंगच्या सहाय्याने आपले जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. याचा लाभ एसबीआयच्या खातेधारकांना घेता येणार आहे. व्यक्तीकडे आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत रजिस्टर्ड असावा. पेन्शन अर्जात सुद्धा हा क्रमांक असावा. ही सुविधा पेन्शनधारकांना खासकरुन उपलब्ध करुन दिली आहे.