Aadhaar Card (Photo Credits: PTI)

सध्याच्या युगात आधार कार्डचा (Aadhar Cared) वापर जवळपास सर्वत्र केला जातो. आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. हा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी योजना, अनुदान इत्यादींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, काही फसवणुकीमुळे तुमचे आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

आधार क्रमांक जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही सुविधा पुरवते जेणेकरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तुम्ही तपासू शकता. तर आधार कार्डचे ऑथेंटिकेशन हिस्ट्री या पद्धतीने तपासून पाहू शकता.(SpiceJet ची खास सुविधा, प्रवाशांना आता EMI मध्ये करता येईल तिकिटचे पेमेंट)

> >सर्व प्रथम, तुम्ही आधार क्रमांक जारी करणारी संस्था UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in वर जा.

>> यानंतर Aadhar Authentication History वर क्लिक करा.

>> आता तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाका.

>> त्यानंतर 'जनरेट ओटीपी' वर क्लिक करा

>> OTP टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या नमूद करावी लागेल.

>> आता निवडलेल्या कालावधीसाठी प्रमाणीकरण विनंतीचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.

तुम्हाला तुमच्या आधारच्या वापरात काही गैरवापर झाल्याची शंका असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास, तुम्ही ताबडतोब UIDAI टोल फ्री क्रमांक- 1947 वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.