SpiceJet ची खास सुविधा, प्रवाशांना आता EMI मध्ये करता येईल तिकिटचे पेमेंट
SpiceJet Flight | File Image | (Photo Credits: PTI)

स्पाइसजेट कंपनीने प्रवाशांसाठी एक नवी सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना तिकिटासाठी 3, 6 किंवा 12 हप्तांमध्ये तिकिटांचे पेमेंट करता येणार आहे. कंपनीने म्हटले की, सुरुवातीला ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त व्याजाच्या 3 महिन्याच्या EMI चा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ईएमआयच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा वीयआडी (VID) सारखी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्याचसोबत ते पासवर्डच्या माध्यमातून वेरिफाय ही करावे लागणार आहेत. ग्राहकांना आपला युपीआय आयडीच्या माध्यमातून ईएमआयचे पेमेंट करावे लागणार आहे. स्पाइसजेट यांनी असे म्हटले की, ईएमआय सुविधेचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती देण्याची गरज नाही आहे.

एअरलाइनने 31 ऑक्टोंबर पासून 28 नवी देशाअंतर्गत उड्डाणे सुरु केली आहेत. एअरलाइनने विंटर सीजननुसार, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूरच्या पर्यटन स्थळांना जोडणारी काही नवी नॉन-स्टॉप उड्डाणे सुरु केली. स्पाइसजेट एअरलाइन्सची ही उड्डाणे उदयपूरला कोलकाता, बंगळुरू आणि मुंबई येथून जोडली गेली आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि जयपूरसह जैसलमेर, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसह जोधपूर आणि जयपूरसह बागडोगराला जोडणारी उड्डाणे सुद्धा सुरु केली आहेत.(Indigo ने सुरु केली खास सर्विस, फक्त 325 रुपयात एअपोर्टवरुन थेट घरी पोहचवले जाणार सामान)

स्पाइसजेटच्या या सुविधेसाशाठी नागरिकांना प्रथम अधिकृत वेबसाइट spicejet.com किंवा कंपनीचे अॅप डाउनलोड करुन तिकिट बुकिंग करता येणार आहे. काही ट्रॅव्हल एजेंसीकडून तिकिटावर शानदार ऑफर सुद्धा देतात. EaseMyTrip वर तुम्ही देशाअंतर्गत तिकिट बुक करु शकता. ईजीमईट्रिप तिकिटाव 2500 रुपयांपर्यंत ऑफर देते. यासाठी तुम्हाला फ्लाइट तिकिटच्या पेमेंटवेळी एकावेळी FLYFAMILY चा वापर करावा लागणार आहे. जर तुम्ही travolook.in येथे 31 ऑक्टोंपर्यंत तिकिट बुकिंग करत असाल तर तुम्हाला उत्तम डिल्स मिळणार आहेत. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म goibibo वर सुद्धा तिकिट बुकिंगसाठी 2 हजार रुपयांपर्यंत ऑफर दिली जात आहे.