Indigo ने सुरु केली खास सर्विस, फक्त 325 रुपयात एअपोर्टवरुन थेट घरी पोहचवले जाणार सामान
IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

एखाद्या ठिकाणी फिरायला किंवा महत्वाच्या कामासाठी जायचे असेल पण त्यावेळी नेमके किती सामान सोबत घेऊन जावे असा प्रश्न पडतोच. त्यासाठी पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून सामान एअरपोर्टवर आणणे आणि नंतर बोर्डिंग केल्यानंतर कन्वेयर बेल्टची वाट पाहणे या गोष्टींसाठी बरासचा वेळ जातो. या गोष्टीपासून मुक्तता होण्यासाठी इंडिगो (Indigo) कंपनीने प्रवाशांसाठी एक खास सर्विस सुरु केली आहे. त्यानुसार, तुमचे सामान घरातून तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे असेल तेथे पोहचवले जाणार आहे.(Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)

इंडिगो यांनी असे म्हटले की, ते डोर-टू-डोर बॅगेज ट्रान्सफर सर्विस सुरु करणार आहेत. प्रवास जेथून सुरु होणार तेथूनच सामान सुरक्षितपणे पिक-अप करत गंतव्य ठिकाणापर्यंत पोहचवले जाणार आहे. इंडिगोची ही सुविधा सध्या बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसाठी सुरु केली आहे. इंडिगोने असे म्हटले की, ग्राहकांचे सामान व्यवस्थितीत आणि सुरक्षितपणे आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहचवले जाणार आहे.(Diwali 2021 Sales: खर्चाच्या बाबतीत यंदाच्या दिवाळीने मोडला गेल्या 10 वर्षांतील विक्रम; देशभरात झाला सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यापार)

Tweet:

प्रवाशांना या सुविधेसाठी फक्त 324 रुपये द्यावे लागणार आहेत. या सुविधेसाठ त्यांनी 6EBagport असे नाव दिले आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना फ्लाइटमधून प्रवास करण्यापूर्वी 24 तास आधी बॅगेज सर्विसचा फायदा घेता येणार आहे. या सर्विससाठी कंपनी कार्टरपोर्टर सोबत पार्टनरशिप करणार आहे.