Sandeshkhali Case: TMC नेते शेख शाहजहान यांना अटक; संदेशखाली जमीन हडप, लैंगिक अत्याचार प्रकरण
Sheikh Shahjahan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संदेशखाली प्रकरणात (Sandeshkhali Case) तृणमूल काँग्रेस (TMC) नेते शेख शाहजहान (Sheikh Shahjahan Arrested) यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) गुरुवारी (29 फेब्रुवारी) सकाळी अटक केली. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) आणि जमीन हडप (Land Grab) केल्याचा आरोप आहे. त्यांना त्तर 24 परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथून अटक करण्यात आली असल्याचे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने मिनाखान एसडीपीओ अमिनुल इस्लाम खान यांच्या हवाल्याने दिले आहे. पाठिमागील अनेक दिवसांपासून संदेशखाली प्रकरण देशभर गाजते आहे. खास करुन भाजपने हे प्रकरण लावून धरले होते आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर दबाव आणत टीकेची झोड उठवली होती.

पश्चिम बंगाल राज्यात राजकीय वातावरण तापले

बसीरहाट न्यायालयात शेख शाहजहान यांना आज दुपारी 2 वाजता हजर केले जाणार आहे. संदेशखाली प्रकरणात नाव आल्यापासून आणि या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरु झाल्यापासून म्हणजेच साधारण एक महिन्यापासून शहाजहान बेपत्ता होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या अटकेच्या कारवाईपासून ते स्व:चा बचाव करत होते. पोलिसांसमोर येणे टाळत होते. अखेर त्यांना पलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर असताना पश्चिम बंगाल राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच संदेशखाली प्रकरण भाजपने लावून धरत ममता बॅनर्जी यांच्या सरकारसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, Sandeshkhali Case: शेख शाहजहान यांना अटक करा; संदेशखाली प्रकरणात कोलकाता हायकोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारला निर्देश)

शहाजहान शेख TMC नेता

आरोप आहे की, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेस  नेता असलेला शहाजहान शेख हा मोठ्या प्रमाणावर महिला आणि स्थानिकांचे शोषण करतो. त्यामुळे महिलांचा एक गट या नेत्याविरोधात आक्रमक झाला असून अत्याचाराविरोधात न्याय मागतो आहे. अनेक महिलांनी आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करत शेख यांना अटक व्हावी आणि कायदेशीर कारवाई द्वारे आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. या महिलांनी शाजहान शेख आणि त्याच्या जवळच्या साथीदारांवर जबरदस्तीने "जमीन हडप आणि लैंगिक अत्याचार" केल्याचा आरोप केला होता. (हेही वाचा, Republic TV Journalist Arrested: संदेशखाली येथे रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पत्रकाराला पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक)

एक्स पोस्ट

दरम्यान, संदेशखाली कथीत अत्याचार प्रकरण न्यायालयात पोहोचले. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळून लावत शाहजहान शेख यांना अटक करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर जवळपास तीन दिवसांनी ही अटक झाली आहे. कोलकाता उच्च न्यायालयात 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत (कोर्टाने) आदेश दिले की, संदेशखाली यांना अटक व्हायला हवी. त्यांना अटक न करण्याचे कोणतेही कारण नाही. या प्रकरणात जाहीर नोटीस देण्यात यावी. त्यांच्या अटकेला स्थगिती दिल्याचे भासवले जात आहे. मात्र, तसे कोणत्याच प्रकारचे आदेश नाहीत. त्यामुळे या प्रकरणात अटक व्हायला हवी. दुसऱ्या बाजूला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 23 फेब्रुवारी रोजी कथित जमीन बळकावल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांसह पश्चिम बंगालमधील जवळपास अर्धा डझन ठिकाणी यापूर्वीच छापे टाकले आहेत.