Koko | (Photo Courtesy: YouTube)

YouTube वर 'कोको इन इंडिया' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रशियन युट्युबरचा दिल्ली येथील सरोजिनी नगर (Russian YouTuber harassed in Sarojini Nagar) मार्केट परिसरात एका व्यक्तीकडून छळ झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. दिल्लीमध्ये व्लॉगिंग करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ह ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महलांची सुरक्षा आणि विदेशी नागरिकांसोबत होणाऱ्या आक्षेपार्ह वर्तनाचा मुद्दा पुढे आला आहे.

रशियन व्लॉगरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक अनोळखी व्यक्ती वारंवार तिच्याकडे येत आहे आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे. तो वारंवार तिला मैत्री करण्यासाठी आणि तिच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. ज्यासाठी तिचा स्पष्ट नकार मिळतो. तरीही तो आपला प्रयत्न कायम ठेवतो. ज्यामुळे ती अस्वस्थस्त होते.

व्हिडिओमध्ये सदर व्यक्तीचे वर्तन आणि दोघांमधील संवादही पाहायला मिळतो आहे. तो व्यक्ती महिलेचा पाठलाग करताना आणि तिला त्याच्याशी मैत्री करायला आवडेल का असे विचारताना दिसतो. सदर व्यक्तीने तिला विचारले की, तू माझी मैत्रिण होऊ शकतेस का? महिलेने हिंदीत उत्तर दिले, “लेकिन मै आपकी नही जानती हू” (पण मी तुम्हाला ओळखत नाही). तेव्हा तो माणूस म्हणाला, “जान-पहचान दोस्ती से हो जाएंगे” (आपण मित्र झाल्यावर एकमेकांना ओळखू शकतो). मात्र, रशियन महिलेने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि मला नवे मित्र नको आहेत असे सांगितले.

इतके सगळे होऊनही तो व्यक्ती इतका इरेला पेटला होता की, तो तिच्यासोबत संवाद कायम ठेऊ इच्छित होता. तो तिला म्हणाला की, 'तू खूप मादक आहेस'. त्याचे बोलणे ऐकून ती अस्वस्थ झाल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ कोकोच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडिओ

जे लोक ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या सामग्रीमुळे प्रसिद्धी मिळवू लागतात. अलिकडच्या वर्षांत, हे निर्माते त्यांच्या व्हिडिओंना युट्यूबवर अपलोड करतात. युट्युबवर चॅनेल बनवतात. ही सामग्री अतिशय व्यावसायिक बनली आहे. हा एक व्यवसाय बनला आहे. ज्याद्वारे Youtubers भरपूर उत्पन्न मिळवतात. अलिकडील काळात अनेक युट्युबर्स मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवतात. परंतू, ते माहितीचा एकमोठा स्त्रोतही निर्माण करुन देतात. अर्थात त्या माहितीतील तपशील आणि वास्तववाद यांचा संबंध प्रेक्षलालाच तपासून पाहावा लागतो.