Rules Change For LIC: एलआयसी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! सरकारकडून नियमांत मोठा बदल
LIC (Photo Credit - PTI)

Rules Change For LIC:  भारतीय जीवन बीमा निगम म्हणजेच एलआयसी कडून काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने घोषणा केली आहे की, आता एलआयसीसाठी प्रत्येक शनिवारी सार्वजिक सुट्टी (Public Holiday) असणार आहे. म्हणजेच प्रत्येक शनिवारी एलआयसी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. सरकारकडून हे बदल नेगोशिएबल इंस्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881 च्या सेक्शन 25 अंतर्गत करण्यात आले आहे.(7th Pay Commission DA, DR Benefits: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA, DR चा कितपत मिळणार लाभ? जाणून घ्या)

जर तुम्हाला एलआयसीच्या ऑफिसमध्ये जाऊन कोणतेही काम करायचे असल्यास ते आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान करावे लागणार आहे. कारण शनिवार आणि रविवारी एलआयसी ऑफिस बंद राहणार आहे. त्यामुळे एलआयसी ग्राहक आणि एलआयसीच्या ऑफिसमध्ये काम करायचे असल्यास या कालावधीनुसारच करावे लागणार आहे.(Citibank: भारत आणि चीनसह 13 देशांमधून सिटी बँक घेणार काढता पाय; 4000 लोकांच्या नोकरीवर गदा, जाणून घ्या कारण)

एलआयसी कर्मचाऱ्यांचे 1 ऑगस्ट 2017 पासून वेज रिव्हिजन शिल्लक आहे. वेज रिवीजनच्या दरम्यानच एक अतिरिक्त सुट्टी मिळणे हे एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. युनियनचे प्रमुख यांनी असे म्हटले आहे की, इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, जेव्हा वेज रिविजनमध्ये ऐवढा वेळ लागला आहे. युनियनच्या नेत्यांसह बैठक घेतल्यानंतर मॅनेजमेंटचा अंतिम प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आणि अर्थ मंत्रालयाने नोटिफिकेशन जाहीर करण्यापूर्वी यामध्ये बदल करु शकतात.