न्याय स्किमच्या (Nyay scheme) माध्यमातून ज्यांचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाच व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले होते. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दर जाहीर केले होते. मात्र अवघ्या 48 तासांच्या अगोदगरच महिलांसाठी ही योजना असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देणार असल्याचे म्हटले होते. तसेच न्याय स्किमचा फायदा जवळजवळ 5 कोटी गरिब कुटुंब आणि 25 कोटी लोकांना होणार असल्याचे आश्वासन सोमवारी जनतेला दिले. परंतु ही योजना फक्त महिलांना लागू असणार असल्याचे कोठेही उल्लेख केला नाही. मात्र आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही योजन फक्त स्त्रियांसाठीच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (हेही वाचा-काँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा)
देशात गरिब लोकांसाठी अजून 22 टक्के योजना उर्वरित आहेत. त्यामुळे योजनासुद्धा निकाली निघतील असा दावा सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच भाजप पक्षावर सुद्धा त्यांनी जोरदार टीका केली.