SBI (Photo Credits-Twitter)

स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) मोठा धक्का बसला असून काही नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने (RBI) चक्क 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर नॉन परफॉर्मिंग अॅसेट आणि अन्य तरतुदीसंबंधित नियमांचे पालन एसबीआयने केले नाही. त्यामुळे आरबीआयकडून कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचसोबत युनियन बँकेलासुद्धा 10 लाख रुपयांचा दंड लादण्यात आला आहे.

बँकेकडून चालू खाते उघडण्यासाठी आणि ऑपरेटिंग आचारसंहितेचे उल्लंघन एसबीआयने केले. त्याचसोबत फसवणूक आणि रिपोर्टिंगच्या नियमांचे पालन बँकेने केले नसल्याचा आरोपसुद्धा लगावण्यात आला आहे. तसेच आरबीआयकडून चौकशी अहवाल आणि अन्य महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर एसबीआयला नोटीस ही पाठवण्यात आली होती. मात्र एसबीआयकडून मिळालेल्या उत्तरावर आता आरबीआयने त्यांच्यावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. (बॅंक व्यवहारादरम्यान चूकीचा आधार कार्ड क्रमांक दिल्यास होऊ शकतो 10,000 रूपयांचा दंड)

तर युनियन बँकेला सुरक्षा संबंधित आदेशांचे पालन केल्याने 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने यासाठी एक नोटीस जारी केली होती त्यानुसार दंडाची वसूली बँकेकडून करण्यात येणार आहे. तसेच SWIFT नियमांचे पालन करताना त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई आरबीआयकडून युनियन बँकेवर करण्यात आली आहे.