गृहकर्ज, वाहन कर्ज होणार स्वस्त, RBI ची सर्वसामान्यांना भेट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

वाढती महागाई आणि मंदावलेला विकास यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गृहकर्ज आणि वाहनकर्जावर व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५. ७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकांनंतर व्याज दराबद्दलची रिझर्व्ह बँकेची ही पहिली बैठक होती. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो दरात कपात झाल्याने बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी उपलब्ध होऊ शकतो. या मुळे बँका गृहकर्जे, कार लोनसह इतर कर्जे कमी व्याजदरात देऊ शकणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे नवे कर्ज स्वस्त होणार आहे, तर कर्जे घेतलेल्या लोकांच्या हफ्त्याच्या रकमेत कपात किंवा रिपिटेड कालावधीत कपातीचा फायदा होऊ शकतो.

रेपो रेट दरात 0.25 टक्क्यांची कपात, तुमचा EMI कमी होण्याची शक्यता

उद्योजक तसेच व्यक्तिगत कर्जदार यांच्यासाठी ही समाधानाची बाब ठरण्याची शक्यता आहे. मात्र बँका हा कमी झालेल्या कर्जाचा लाभ ग्राहकांना कसा आणि कधी देते हे बघावे लागेल.