रेपो रेट दरात 0.25 टक्क्यांची कपात, तुमचा EMI कमी होण्याची शक्यता
File image of the RBI | (Photo Credits: PTI)

भारतीय रिझर्व्ह बँकेने ( Reserve Bank of India ) आपले या वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले. या धोरणानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट दर 0.25 टक्क्यांनी कमी झाला. आरबीआयने रेपो रेट (RBI Repo Rate) दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यामुळे नागरिकांचे कर्ज व्याजदर कमी होण्याचा दिलासा मिळू शकतो. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी ही रेपो रेट दर कपातीची घोषणा केली. त्यानुसार आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन कमी होत 6 टक्के इतका राहणार आहे. तर, रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के झाला आहे.

दरम्यान, ज्या लोकांनी बँकांचे कर्ज घेतले आहे त्यांच्या व्याजदरावरही रेपो रेट कपातीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यात गृहकर्ज, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन आदी कर्जांचा समावेश आहे. अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे की, सध्या अर्थव्यवस्था ज्या विचित्र स्थितीतून वाटचाल करत आहे ते पाहता रेपो रेट दरात कपात होणे हे नक्की होता. (हेही वाचा, एप्रिल 2019 पासून Home Loan चे व्याजदर बाजारभावानुसार ठरणार; RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय)

विशेष म्हणजे बँकींग क्षेत्रातील नियामक नियामक रिझर्व बँक पतधोरण ठरवणाऱ्या समितीची (MPC) बैठक बुधवारी सुरु झाली आहे. या बैठकीत काय चर्चा होते यावर अर्थविश्वाची नजर आहे. कारण नव्या आर्थिक वर्षातील ही पहिलीच बैठक आहे.