New Auto-Debit Rules ला RBI कडून 30 सप्टेंबर पर्यंत पुन्हा मुदतवाढ
RBI | (File Image)

आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) याने कोट्यावधी ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. 1 एप्रिल पासून ओटीटी (OTT) सह इतर काही कार्ड्स पेमेंट मध्ये दरमहा शुक्ल आकरण्यासाठी राबवण्यात येणारी 'ऑटो डेबिट' (Auto Debit) प्रणाली आता सहा महिने पुढे ढकलण्यात आली आहे. पण यावेळेस आरबीआयने या नव्या प्रणालीसाठी टाळाटाळ करणार्‍या बॅंका आणि इतर वित्त संस्थांना फटकारलं आहे. दरम्यान ग्राहकांच्या हिताचा विचार करून आरबीआय ने या नियमांबाबत बदल केले आहे. पण तातडीने हे बदल केल्यास ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो असे बॅंकांनी आरबीआय कडे सांगितले आहे. याकरिता आरबीआय ने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आज (30 मार्च) दिवशी आरबीआय ने मुदतवाढ देताना ही अंतिम मुदतवाढ असेल. येत्या 6 महिन्यात नव्या नियमावलींना न स्वीकारल्यास कठोर कारवाईचे देखील संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया च्या गाईडलाईन नुसार, जर तुम्ही मोबाईल किंवा वीज बिल साठी किंवा नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन साठी पेमेंट डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड सोबत लिंक केले असेल आणि त्यामध्ये ऑथेंटिकेशन झाले नसेल तर ऑटो डेबिट पेमेंट पूर्ण होणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार बॅंकांना पेमेंट ड्यू डेट च्या 5 दिवस आधी एक नोटिफिकेशन पाठवावे लागेल. त्यावर ग्राहकांची मंजुरी आवश्यक आहे 5000 पेक्षा जास्त रूपयांच्या पेमेंट वर ओटीपी आवश्यक असणार आहे. (नक्की वाचा: PayPal भारतामध्ये 1 एप्रिल 2021 पासून Domestic Payment Services बंद करणार).

ANI Tweet

आरबीआय ने बॅकिंग फ्रॉड आणि ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी गाईडलाईन जारी केलेली आहे. आरबीआयने यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या नव्या नियमाचा परिणाम भारतात कोट्यावधी ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करणार्‍या ग्राहकांवर होणार आहे. हे नियम लागू होताच व्यवहारांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.