HDFC Bank ला RBI चा दिलासा; नवी Credit Cards देण्यासाठी 8 महिन्यांनी मिळाली मुभा
HDFC (Photo Credit: PTI)

भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टर बॅंक HDFC Bank ला आता आरबीआय (RBI) कडून दिलासा मिळाला आहे. बॅकेने दिलेल्या माहितीनुसार आता आरबीआय ने काही अंशी एचडीएफसी बॅंकेवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे बॅंकेला आता ग्राहकांना नवी क्रेडीट कार्ड्स देणे शक्य होणार आहे. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात आरबीआय ने एचडीएफसीला नवी क्रेडीट कार्ड्स न देण्याचा, Digital 2.0 अंतर्गत डिजिटल बिझनेस जनरेटिंग अ‍ॅक्टिव्हिटी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान ही कारवाई आरबीआयने बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग अ‍ॅप आणि इंटरनेट बॅंकिंग प्लॅटफॉर्म यांच्या येणार्‍या तक्रारीवरून केली होती.

दरम्यान आरबीआयच्या आदेशामुळे एचडीएफसीच्या बॅंकेच्या कार्ड बेस मध्ये डिसेंबर 2020 मध्ये 15.38 million वरून जून 2021 मध्ये 14.82 मिलियन इतकी घसरण झाली आहे. सध्या भारतामध्ये एचडीएफसी बॅंकेचे क्रेडीट कार्ड ईश्युअर सर्वाधिक आहेत. नव्या कार्डच्या बंदीनंतरही अजूनही अव्वल स्थानी बॅंक कायम आहे. नक्की वाचा: HDFC Bank ग्राहकांसाठी सूचना; फसवणूक टाळण्यासाठी ॲप डाऊनलोड करताना घ्या 'अशी' काळजी. 

आता बॅंकेकडून टेक्नॉलॉजी इंफ्रास्ट्रक्चर मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मागील वर्षभर होत असलेल्या तक्रारींच्या भडीमारानंतर आता त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवे बदल केले आहेत, नव्या टॅलेंटला संधी दिली आहे. strategic partners मधून सुविधा वाढवण्याकडे बॅंकेचा सध्या कल असल्याचं सांगितलं जात आहे.

आरबीआयने फेब्रुवारी 2021 मध्ये एका कंपनीला एचडीएफसी बॅंकेचे आयटी इंफ्रास्ट्रक्चर ऑडिट करण्यास नियुक्त केले होते. HDFC चे मुख्य सूचना अधिकारी रमेश लक्ष्मीनारायणन यांनी जून 2021 मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेने सर्व बाबींची पूर्तता केली आहे. सोबतच तांत्रिक कमतरता  देखील दूर केल्याने आता आरबीआयने एचडीएफसीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.