Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात ऑनलाईन व्यवहारांना (Online Transaction) गती आली आहे. नेटबँकिंगचा (Netbanking) वापर वाढल्याने सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. फ्रॉडर्सच्या फसवणुकीच्या जाळ्यात ग्राहकांसाठी अडकू नये, म्हणून एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) काही सूचना जारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेचे मोबाईल अॅप (HDFC Bank Mobile App) डाऊनलोड करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने बँकेने ट्विटच्या माध्यमातून सूचना जारी करत ग्राहकांना सतर्क केले आहे.

स्क्रीन शेअर पर्यायाने कधीही अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करू नये. फ्रॉडर्स अनेकदा ग्राहकांना स्क्रीन शेअर करण्याचा सल्ला देतात आणि याद्वारे फसवणूक करतात. त्यामुळे मोबाईल अॅप डाऊनलोड करताना स्क्रीन शेअर करु नका. तसंच  अज्ञात कंपन्यांकडून किंवा व्यक्तीकडून येणारे फोन किंवा ईमेलद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकद्वारे अॅप डाऊनलोड करु नका, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. (Google Pay Fraud Call: कस्टमर केअर च्या नावाखाली गुगल पे वरुन 'अशी' केली जात आहे फसणवूक, Watch Video)

HDFC Bank Tweet:

स्क्रीन शेअर केल्यास मोबाईलचा अॅक्सेस फ्रॉडर्सला मिळतो आणि त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती त्यांना मिळेल. तसंच ओटीपी जनरेट करुन ते तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. त्यामुळे योग्य ठिकाणाहून अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करणे योग्य ठरेल, असेही बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.