ग्रहण (Eclipse) ही एक सामान्य खगोलीय घटना असली तरीही भारतीय जनसमाजामध्ये ग्रहणाची अनेक धार्मिक गोष्टी निगडीत आहेत. ग्रहण काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. त्यामध्ये अन्न शिजवणं, अन्न खाणं, गरोदर स्त्रियांनी घराबाहेर न पडणं, ग्रहण न पाहणं ते सेक्स टाळणं अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान ग्रहण काळात याच पाळल्या जाणार्या नियमांना आव्हान देण्यासाठी एक बिर्याणीची मेजावानी (Biryani Feast) आयोजित करण्यात आली होती. काल चंद्रगहणामध्ये (Lunar Eclipse) आणि तत्पूर्वी सूर्यग्रहणामध्येही (Solar Eclipse) अशाच प्रकारे मेजवानीचं आयोजन करण्यात आले होते.
भुवनेश्वर आणि बरहमपूर मध्ये आयोजित मेजवानीला हिंदू नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामध्ये पूरी शंकराचार्य यांचाही समावेश होता. सूर्यग्रहणा पाठोपाठ चंद्रग्रहणातही हा निर्णय जाहीर करत तर्कवाद्यांनी परंपरावाद्यांना आव्हान दिले होते.
चंद्र किंवा सूर्य ग्रहण काळात कुणीही काहीही खाऊ शकतं हा संदेश तर्कवाद्यांना जनसामान्यांना द्यायचा होता त्यासाठी त्यांनी या मेजवानीचं आयोजन केले होतं. लोकांनी विज्ञानांची कास धरावी आणि अंधश्रद्धांचा त्याग करावा असे देखील त्यांच्याकडून लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होता. पण धार्मिक रिती पाळणार्या एका ग्रुपने हा प्रयत्न धुडकावत गोंधळ घातला. प्रकार हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणामध्ये आणावी लागली. यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला.
लोहिया अकॅडमी मध्ये सुद्धा चंद्रग्रहणात अशा प्रकारे धार्मिक रीती-रिवाजांना धुडकावण्यासाठी आयोजित कार्यक्रम होता. तेथेही बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहचले आणि त्यांनी अन्न ग्रहण रोखले.